साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला आहे. जरंडेश्वर साखर कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात आहे. विशेष म्हणजे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी कालच म्हणजे बुधवारी जरंडेश्वर कारखान्याला भेट दिली होती. त्यानंतर लगेचच ही कारवाई करण्यात आली आहे. याच प्रकरणावर आता राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार काहीही दडवत नाहीत, असं विधान त्यांनी केलं आहे.

आजपासून राज्यातली मंदिरं खुली होत आहेत. यानिमित्त पुण्यातल्या दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात ते दर्शनासाठी आले होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. कारखान्यांवर टाकलेल्या छाप्यांबद्दल ते म्हणाले, “आमच्या नेत्यांना बदनाम करण्याचं कारस्थान भाजपाने केलं आहे. भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादीचा धसका का घेतला आहे, हे विचार करण्यासारखं आहे. पण आमचा कायद्यावर विश्वास आहे. छगन भुजबळ यांनाही असाच त्रास देण्याचा प्रयत्न झाला मात्र ते निर्दोष सुटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते निर्दोष आहेत. कोणताही गैरव्यवहार त्यांच्याकडून झालेला नाही तरी त्यांना बदनाम करणं हाच यामागचा हेतू आहे. या देशातल्या सर्व तपास यंत्रणा भाजपा चालवत आहे”

forest cover , Sindhudurg district, Western Ghats,
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वनआच्छादनात वाढ तर पश्चिम घाटात घट, चिंतेची बाब
Hemlata Patil
Hemlata Patil : काँग्रेसला मोठा धक्का? ऐन महापालिका…
Sharad Pawar and Vinod Tawade over Amit Shah Critisicm
Vinod Tawade : “पवारांनी दाऊदच्या हस्तकांना हेलिकॉप्टरमधून प्रवास घडवला”; विनोद तावडेंचा गंभीर आरोप!
Panchgani Mahabaleshwar tourism, Panchgani ,
पाचगणी, महाबळेश्वरच्या पर्यटनाला ‘थंड’ प्रतिसाद; निवडणुकांचा फटका
Anjali Damania post About Walmik Karad
Anjali Damania : अंजली दमानियांनी पुन्हा उपस्थित केले आठ प्रश्न; “वाल्मिक कराडला शासकीय अंगरक्षक? गंभीर गुन्हे दाखल होऊनही…”
Suresh Dhas
Suresh Dhas : “माणसं मारायला लागल्यावर त्याचं समर्थन करायचं का?”, वाल्मिक कराडची भेट घेतल्याच्या दाव्यावर सुरेश धस स्पष्टच बोलले
Sanjay Raut On Dhananjay Munde and PM Modi Mumbai Visit
Dhananjay Munde : “…मग धनंजय मुंडेंवर अन्याय का?”, PM मोदींच्या कार्यक्रमापासून दूर ठेवल्याच्या मुद्यावर राऊतांचा थेट सवाल
Walmik Karad Mother Parubai Karad
Walmik Karad : वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर आईची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “आता मी मेल्यावर पाणी पाजायला…”
Maharashtra News Live Updates in Marathi
Maharashtra News LIVE Updates : वाल्मिक कराड तुरुंगात गेला, त्याला मकोका लावला म्हणून परळी बंद करणं योग्य नाही-सुरेश धस

किरीट सोमय्या सातत्याने म्हणत आहेत की अजित पवारांनी जरंडेश्वर कारखान्यासंदर्भातली माहिती, कागदपत्रे उघड करावीत. मग तरीही अजित पवार उघड का करत नाहीत याविषयी पाटलांना विचारणा करण्यात आली. त्यावर जयंत पाटील म्हणाले, “अजित पवारांनी कशाचीच कागदपत्रं कधी दडवली नाहीत. मग जाहीर करण्याचा प्रश्च येत नाही. त्यामुळे अजित पवारांना दडवण्यासारखं काहीच नाही. ते कधीही दडवत नाहीत”.

हेही वाचा – अजित पवार अडचणीत?; साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर इन्कम टॅक्सचा छापा

साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला आहे. जरंडेश्वर साखर कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात आहे. विशेष म्हणजे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी कालच म्हणजे बुधवारी जरंडेश्वर कारखान्याला भेट दिली होती. त्यानंतर लगेचच ही कारवाई करण्यात आली आहे. सीआरपीएफच्या जवानांची मदत घेऊन ही कारवाई सुरू असून जरंडेश्वर कारखान्यात एक टीम दाखल झाली असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अजित पवारांशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी इन्कम टॅक्स विभागाकडून कारवाई केली जात आहे. फक्त जरंडेश्वरच नाही तर दौंड शुगर, आंबलिक शुगर , जरंडेश्वर साखर, पुष्पदनतेश्वर शुगर, नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर कारवाई सुरू असल्याचं कळत आहे. हे सर्व साखर कारखाने अजित पवारांच्या निकटवर्तीयांचे असल्याचं कळत आहे.

Story img Loader