Ajit Pawar on CM Post: गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर अजित पवारांनी केलेल्या भाषणामध्ये राज्याचं मुख्यमंत्रीपद हवं असल्याची जाहीर इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. मात्र, आता अजित पवारांनी नरमाईची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्रीपदाबाबत तडजोड करण्यास आपण तयार असून पहिलं लक्ष्य महायुतीचं सरकार निवडून आणणं असल्याचं अजित पवार म्हणाले आहेत. मुख्यमंत्रीपद हा मुद्दा आमच्यासाठी सध्या गौण आहे, असं अजित पवार टीव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीमध्ये नमूद केलं आहे.
पक्षफुटीवेळी काय म्हणाले होते अजित पवार?
राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर अवघ्या तीन दिवसांत झालेल्या जाहीर सभेमध्ये अजित पवारांनी शरद पवारांच्या वारंवार बदलत्या भूमिकांवर तोंडसुख घेतलं होतं. तसेच, त्यांनी कुठेतरी थांबायला हवं असंही अजित पवार तेव्हा म्हणाले होते. याच भाषणात अजित पवारांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती. “चार चार वेळा उपमुख्यमंत्री झालो. माझं तर रेकॉर्ड झालंय. पण तिथेच गाडी थांबते. पुढे गाडी जातच नाही. मला मनापासून वाटतंय की मी राज्याचा प्रमुख व्हावं. माझ्या मनात काही गोष्टी आहेत. त्या राबवायच्या म्हटलं तर प्रमुखपद लागतं. जवळपास ९० विधानसभेच्या जागा आपण लढवणार आहोत. लोकसभेच्या जागाही आपण लढवणार आहोत”, असं जाहीर विधान अजित पवारांनी तेव्हा केलं होतं.
९० जागाही नाहीत आणि मुख्यमंत्रीपदही नाही!
दरम्यान, विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर समोर आलेला जागावाटपाचा आकडा पाहाता अजित पवारांच्या राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकीसाठी ९० जागा मिळालेल्या नसल्याचं पाहायला मिळत आहे. अजित पवारांकडून जवळपास ५४ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. एकीकडे हाती कमी जागा आलेल्या असताना त्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी मुख्यमंत्रीपदावरही सध्या तडजोड करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
ओ
मुख्यमंत्रीपदाबाबत काय म्हणाले अजित पवार?
अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाबाबत विचारणा केली असता त्यांनी त्यासाठी १४५ आमदारांचं पाठबळ पाठीशी लागतं, अशी भूमिका मांडली. “मला चांगलंच माहिती आहे की १४५ आकडा माझ्या पाठिशी जोपर्यंत उभा राहू शकत नाही तोपर्यंत ते पद मला मिळू शकत नाही. तेव्हा मी ९० जागांबाबत बोललो होतो. पण आता निवडणुकीची धामधूम चालू आहे. आम्ही युती केली आहे. युतीचं पहिलं लक्ष्य १७५ पेक्षा जास्त जागा निवडून आणायच्या. त्यानंतर आम्ही एकत्र बसून नेता निवडू”, असं अजित पवार म्हणाले.
“आम्ही मुख्यमंत्रीपदासाठी थांबू. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करताना दोन पावलं पुढे-मागे करावंच लागतं. तडजोड करणारा माणूसच यशस्वी होऊ शकतो. त्यामुळे आमच्या दृष्टीने मुख्यमंत्रीपदाचा मुद्दा गौण आहे. आमच्यासाठी जनतेनं महायुतीचं सरकार निवडून द्यावं हा मुख्य अजेंडा आहे”, असं अजित पवारांनी नमूद केलं.
धरसोड वृत्तीला अजित पवारांचा विरोध
दरम्यान, धरसोड केल्यास विश्वासार्हता कमी होते, अशी भूमिका यावेळी अजित पवारांनी मांडली आहे. २३ तारखेला निकाल जाहीर झाल्यानंतर वेगळी भूमिका घेणार का? अशी विचारणा केली असता अजित पवारांनी महायुतीसोबतच राहणार असल्याचं स्पष्ट केलं. “आम्ही आता महायुतीमध्ये आहोत. तुम्ही सातत्याने धरसोड केली तर तुमची विश्वासार्हता राहात नाही”, असं अजित पवार म्हणाले.