इस्त्रोच्या चांद्रयान-३ मोहिमेकडे भारतासह संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. हे यान चंद्रावर उतरण्यासाठी आता अवघे काही तास उरले आहेत. चांद्रयान-३ मोहिमेतील लँडर २३ तारखेला संध्याकाळी चंद्रावर उतरणार आहे. चांद्रयान-२ च्या अपयशानंतर इस्त्रो आता चांद्रयान-३ ची मोहीम यशस्वी होण्यापासून अवघं एक पाऊल दूर आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत मिश्किल विधान केलं आहे. अजित पवारांच्या विधानानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही हसू आवरलं नाही.

नेमकं काय घडलं?

खरं तर, केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के कर लागू केला आहे. यामुळे संपूर्ण देशातील शेतकरी वर्ग नाराज झाला आहे. महाराष्ट्रातील नाशिकसह विविध शहरांमध्ये शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात उतरले आहेत. या कांदा प्रश्नावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सह्याद्री अथितीगृह येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी चांद्रयानबद्दल विचारलेल्या एका प्रश्नावर अजित पवारांनी हटके उत्तर दिलं आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही हसू आवरता आलं नाही.

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
When Devendra Fadnavis becomes Chief Minister conspiracy is hatched to create communal tension says Amar Sable
“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात तेव्हा जातीय तणाव निर्माण करण्याचं षड्यंत्र…”- अमर साबळे
ajit pawar meets sharad pawar
पहिला मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
ajit pawar rahul narvekar
Video: “जे आहे ते आहे, लाडक्या बहिणीनेच आम्हाला…”, अजित पवारांची विधानसभेत स्पष्टोक्ती!
What Devendra Fadnavis Said About Rahul Narwekar ?
Devendra Fadnavis : “राहुल नार्वेकर पुन्हा येईन म्हणाले नव्हते तरीही पुन्हा आले..”, देवेंद्र फडणवीस यांचं खुमासदार भाषण
Order to seize Ajit Pawar property cancelled Mumbai news
शपथ घेतली, चिंता मिटली; अजित पवारांना दिलासा, मालमत्तेवर टाच आणण्याचा आदेश रद्द

हेही वाचा- “ही नामर्दानगी आहे”, बच्चू कडूंचा मोदी सरकारला घरचा आहेर; म्हणाले, “सत्ता टिकावी म्हणून…”

चांद्रयानाबाबत विचारलेल्या प्रश्नावर अजित पवार पत्रकाराला उद्देशून म्हणाले, “अरे आधी उतरू दे ना, एवढी घाई का करतोय.” या मिश्किल विधानानंतर पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला. यावेळी चांद्रयान-३ मोहिमेवर भाष्य करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “हे खूप मोठं यश आहे. उद्या चांद्रयान चंद्रावर यशस्वीपणे उतरेल. यानंतर आपण सर्वजण आनंद साजरा करू. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली हे चांद्रयान-३ चं यशस्वी प्रक्षेपण केलं आहे.”

Story img Loader