शिंदे गटाने आज (मंगळवार, १३ जून) विविध वृत्तपत्रांमध्ये जाहिरातबाजी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यातील सर्वात जास्त लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत, अशा प्रकारची ही जाहिरात आहे. देवेंद्र फडणवीसांपेक्षा अधिक मतं एकनाथ शिंदे यांना मिळाली आहेत, असंही सर्वेच्या आधारे जाहिरातीत म्हटलं आहे. या जाहिरातबाजीवरून विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे.

“या जाहिरातबाजीने शिंदे यांनी स्वतः चे हसे करून घेतलं आहे. तुम्ही (एकनाथ शिंदे) जर इतके लोकप्रिय आहात तर मग उद्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करा आणि जनतेच्या मैदानात या… जनतेच्या मैदानात जनता कुणाच्या पाठीशी आहे? हे कळेल. जनता मविआच्या पाठीशी किती आहे, शिंदे गटाच्या व भाजपाच्या पाठीशी किती आहे? हे चित्र स्पष्टपणे पहायला मिळेल,” अशा शब्दात अजित पवारांनी टोलेबाजी केली.

Priyanka Gandhi statement regarding those who show BJP flags during road shows
रोड-शो दरम्यान भाजपचे झेंडे दाखवणाऱ्यांना प्रियंका गांधी म्हणाल्या, तुम्हाला शुभेच्छा मात्र…
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Uddhav Thackeray speech
“…अन् प्रियांका गांधींनी भाजपाचे दात घशात घातले”, पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ आव्हानाला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर
Eknath Shinde, Sangola, Shahajibapu Patil,
शहाजीबापू पाटील आमच्या टीमचे ‘धोनी’! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले कौतुक
Raju Patil Sandeep Mali
राजकिय वातावरण गढूळ करणाऱ्या शिंदे पिता-पुत्राचे राजकारण संपविण्याची वेळ आली आहे; मनसे आमदार राजू पाटील यांची संतप्त प्रतिक्रिया
Eknath Shinde On Uddhav Thackeray :
Eknath Shinde : “बंद सम्राटांना कायमचं…”, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मुंबईच्या सभेतून इशारा
eknath shinde comment ladki bahin yojana daryapur vidhan sabha
मुख्‍यमंत्री म्हणतात, मी शंभरवेळा तुरूंगात जाण्‍यास तयार…कारण…

हेही वाचा-“मला शिंदे गटाच्या काही खासदारांनी सांगितलं…”, अजित पवारांचा मोठा दावा; म्हणाले, “गेल्या एक वर्षात…!”

शिवसेना आमचीच आहे, अशाप्रकारचा दावा करणाऱ्यांनी जाहिरातीमध्ये मोदींचा आणि स्वतः चा फोटो टाकला. परंतु बाळासाहेबांचा फोटो सोयीस्कररित्या वगळला आहे. हा बाळासाहेबांचा अपमान नाही का? असा सवाल विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. मी गेली ३२ वर्षे सरकारमध्ये किंवा सरकारच्या बाहेर राहून खासदार किंवा आमदार म्हणून काम करतोय. पण अशी जाहिरात कधी पाहिली नाही, असा उपरोधिक टोलाही अजित पवार यांनी लगावला.

हेही वाचा- कृषीमंत्र्यांच्या जिल्ह्यातील ‘त्या’ प्रकरणाबद्दल प्रश्न विचारताच अजित पवार संतापले; नेमकं घडलं काय?

शिंदे गटाची ही जाहिरात असून त्या गटाचे लोक इतक्या लवकर बाळासाहेब ठाकरे यांना कसे विसरले? बाळासाहेबांच्या विचारांचे, आनंद दिघे यांच्या विचारांचे आहात म्हणून शिवसेना खेचून घेतली, मग जाहिरातीमध्ये हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचे फोटो का नाहीत? असा सवालही अजित पवार यांनी विचारला.

हेही वाचा- “विदेशी शक्ती भारताला अस्थिर करण्यासाठी…”, अनुराग ठाकूर यांचा जॅक डोर्सींवर हल्लाबोल!

या जाहिरातीमध्ये स्वतः च ठरवून सर्वेक्षण केले आहे. हे सर्वेक्षण नेमकं कुठे केलं? कुणी केलं? कुणाला किती टक्के पडले, हे कुणी सांगितलं? याचा काहीही थांगपत्ता नाही. एक्झिट पोल येतात, ते कुणी केले ते सांगितलं जातं. पण हा सर्वे छापून राज्याच्या प्रमुखाने एक विश्वविक्रम केला आहे, असा टोलाही अजित पवारांनी लगावला.