Ajit Pawar : दिल्लीत आज ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप झाला. या समारोपाच्या कार्यक्रमासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते. मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमानिमित्त एकनाथ शिंदे आणि अजित पवार एका व्यासपीठावर आले होते. या कार्यक्रमाच्या भाषणात अजित पवारांनी जोरदार फटकेबाजी केली. अजित पवारांनी त्यांच्या भाषणात काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी केलेल्या ‘मला हलक्यात घेऊ नका’ या वक्तव्याचा उल्लेख करत थेट सवाल विचारला, तर अजित पवारांच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे यांनीही उत्तर दिल्याचं पाहायला मिळालं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजित पवार काय म्हणाले?

“आता परवा दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असा काही शब्द वापरला की मला हलक्यात घेऊ नका. आता एकनाथ शिंदे नेमकं कोणाला म्हणाले तेच कळायला मार्ग नाही. मग मशालीने (ठाकरे गट) हलक्यात घ्यायचं नाही की अजून कोणाला घ्यायचं नाही?”, असा सवाल अजित पवारांनी विचारला. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रश्नाला उत्तर दिलं. “मला हलक्यात घेऊ नका हे अडीच वर्षांपूर्वीचं होतं”, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली.

दरम्यान, अजित पवार यांनी यावेळी म्हटलं की, “एकनाथ शिंदे आणि मी एका व्यासपीठावर आलो की आमच्यावर कॅमेरे क्लोज असतात. एवढंच नाही तर आमच्या हावभावावरही लक्ष असतं, म्हणजे आमच्या चेहऱ्यावर हास्य आहे का नाही ते देखील पाहिलं जातं. त्यामुळे मी माझ्या मनाला नेहमी सांगतो की चेहरा प्रसन्न दिसला पाहिजे, नाहीतर दुसरी बातमी व्हायची, असं म्हणत अजित पवारांनी जोरदार टोलेबाजी केली. तसेच आमच्या अर्थात महायुतीत कोणतीही नाराजी नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.