Ajit Pawar On Local Bodie Election: विधानसभेची निवडणूक दोन महिन्यांवर आल्यामुळे सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावारण तापलं आहे. विधानसभेची निवडणूक प्रामुख्याने महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होण्याची चिन्ह आहेत. त्या पार्श्वभूमीवर जागावाटपासंदर्भात महायुतीमधील आणि आघाडीमधील नेत्यांच्या बैठकांचा धडाका सुरु आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असाच सामना पाहायला मिळाला. विधानसभेलाही असाच सामना रंगण्याची चिन्ह आहेत. असं असलं तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं काय? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका युती-आघाड्यामध्ये लढवल्या जाणार की स्वबळावर? याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. अशातच आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सूचक भाष्य केलं.

गेल्या अडीच वर्षामध्ये जर तुम्ही चांगलं प्रशासन दिलं म्हणता, त्यानंतर लोकसभा निवडणूक महायुतीत एकत्र लढता. मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेगवेगळ्या का? असा प्रश्न विचारण्यात आला असता अजित पवार म्हणाले, “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कायमस्वरुपी असचं होतं”, असं म्हणत अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेसचं एक उदाहरण देत सूचक भाष्य केलं. एएनआय या वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

Yogendra Yadav, Bharat Jodo Andolan,
‘भारत जोडो’ आंदोलनातील सहभागी शहरी नक्षलवादी संघटनांची नावे जाहीर करा, योगेंद्र यादव यांचे देवेंद्र फडणवीस यांना आव्हान
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Kasba Constituency, Ravindra Dhangekar,
विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे : रविंद्र धंगेकर
Sanjay Raut and Mallikarjun Kharge
खरगेंच्या मुखी समर्थ रामदासांचा श्लोक, पण संजय राऊत निरुत्तर; जाहीरनामा प्रसिद्ध करताना नेमकं काय घडलं?
Tuljapur Devanand Rochkari, Tuljapur, Dheeraj Patil,
तुळजापुरात मैत्रीपूर्ण लढत की, आघाडीत बिघाडी? मविआचा अधिकृत उमेदवार कोण? रोचकरी की, पाटील?
Nitin Gadkari Umarkhed, Nitin Gadkari Kisan Wankhade,
“काँग्रेसने जातीयवाद आणि सांप्रदायिकतेच विष कालवले,” नितीन गडकरी यांची यवतमाळात टीका
Amit Shah on Uddhav Thackeray
Amit Shah : “उद्धव ठाकरे तुमच्यात दम असेल तर…”, अमित शाहांचं भर सभेत खुलं आव्हान, म्हणाले…
Ramdas Athawales message of unity to Advocate prakash ambedkar
रामदास आठवलेंकडून ॲड.आंबेडकरांना पुन्हा ऐक्याची साद; म्हणाले, ‘आपण दोघेही नरेंद्र मोदींच्या..’

हेही वाचा : ‘सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार?’, अजित पवार म्हणाले, “मी आज…”

अजित पवार काय म्हणाले?

“१० जून १९९९ साली जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. तेव्हा शरद पवार, छगन भुजबळ, पद्मसिंह पाटील, मधुकर पिचड यांच्यासह आदी प्रमुख नेते होते. त्यावेळी मी दुसऱ्या फळीतील नेता होता. तेव्हा ते सर्व प्रमुख नेते होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष का स्थापन करण्यात आला ते सर्वांना माहिती आहे. मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना जूनमध्ये झाली आणि लगेच ऑक्टोबरमध्ये आम्ही काँग्रेसबरोबर आघाडी केली होती. तेव्हा विलासराव देशमुख मुख्यमंत्री आणि छगन भुजबळ उपमुख्यमंत्री झाले होते. त्यानंतर पुढचे १५ वर्ष आम्ही सरकार चालवलं. मात्र, तेव्हाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलो होतोत”, असं अजित पवार म्हणाले.

अजित पवार पुढे म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभेच्या निवडणुकीत आमची आघाडी होती. आता कार्यकर्त्यांना वाटतंच ना की झेडपीचा सदस्य व्हावं, पंचायत समिताचा सदस्य व्हावं. आता त्यावेळी शरद पवार हेच पक्षाचे प्रमुख नेते होते. तेव्हापासून आम्ही आमच्या स्थानिक आमदार आणि जिल्हा पातळीवरच्या पदाधिकाऱ्यांना याबाबत विचारत असतो. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आघाडी करायची की वेगळी निवडणूक लढायची? याबाबतचा निर्णय घेण्याची जबाबदारी आम्ही त्यांच्यावर सोडत असायचो. त्यावेळी काही जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र निवडणूक लढत होतो आणि काही ठिकाणी वेगळं लढत असतं”, असं अजित पवार म्हणाले.