Ajit Pawar : विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं, तर महाविकास आघाडीला पराभवाचा धक्का बसला. आता राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे. ५ डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर आज (१५ डिसेंबर) महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूरमध्ये पार पडत आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या आधी लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात फारसं यश मिळवता आलं नव्हतं.

लोकसभेत महायुतीत भाजपा, शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला फक्त १७ जागा मिळाल्या होत्या. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला फक्त एक जागा जिंकता आली होती. मात्र, त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालं. दरम्यान, लोकसभेला आलेलं अपयश आणि त्यानंतर विधानसभेला मिळालेलं यश आणि या मागची कारणं काय? अपयश आल्यानंतर पक्षाचं काम करत असताना काय-काय बदल केला? त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत यश मिळालं? याची कारणं आज अजित पवार यांनी नागपूरमध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना सांगितली आहेत.

Cyber ​​thieves rob senior citizen who advertised for remarriage Pune news
Pune Cyber Crime: पुनर्विवाहासाठी जाहिरात देणाऱ्या ज्येष्ठाला सायबर चोरट्यांचा गंडा
14 December Rashi bhavishya In Marathi
१४ डिसेंबर पंचांग: आज १२ पैकी ‘या’ राशींवर…
Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
Navneet Rana, Navneet Rana on EVM issue,
‘राजीनामा देण्‍यास तयार, पण…’; नवनीत राणांचे आव्‍हान खासदार वानखडेंनी स्‍वीकारले
Chief Minister Devendra Fadnavis criticizes Sharad Pawar over assembly election defeat pune news
‘संयमाने वागून नेत्यांनी पराभव स्वीकारावा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शरद पवारांवर टीका
The Karanja Sub Bazar Committees board was dismissed and an administrator appointed
महायुती एक्टिव मोडवर! बाजार समिती बरखास्त करीत खासदार गटास दिला झटका.
bahujan vikas aghadi future in vasai virar after defeat all three candidates along with hitendra thakur
वसई-विरारमध्ये हितेंद्र ठाकूर यांच्या बविआचे भवितव्य काय?
article about upsc exam preparation guidance
UPSC ची तयारी : सद्गुणांवर आधारित नैतिक मांडणी

हेही वाचा : Maharashtra Cabinet Expansion : राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला असणार? अजित पवारांचं मोठं विधान

अजित पवार काय म्हणाले?

“लाडक्या बहि‍णींच्या प्रेमामुळे आपण एवढ्या संख्येने आमदार निवडून आणू शकलो. आपण अर्थसंकल्पानंतर सुरु केलेल्या योजनांचा देखील फायदा झाला. १२ तारखेला आम्ही शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी गेलो होतो. त्यानंतर आम्ही अमित शाह यांना भेटलो. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही भेटलोत. सर्वच अगदी कुतुहलाने विचारत होते की लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या १७ जागा निवडून आल्या. मात्र, महाविकास आघाडीच्या ३१ जागा आल्या. मग पाच महिन्यांत असा काय बदल झाला? विधानसभेच्या निवडणुकीत महायुती थेट २३७ पर्यंत पोहोचली. विरोधकांना विरोधी पक्षपदासाठी जेवढ्या जागा लागतात तेवढ्या जागाही त्यांना मिळाल्या नाहीत. लोकसभेला आपण एकच जागा जिंकली. मात्र, अपयशाने खचून जायचं नसतं. यश मिळालं तर हुरळून जायचं नसतं”, असा सल्लाही अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला.

लोकसभेतील अपयशानंतर काय बदल केले?

“अपयशाने पुन्हा जोमाने काम करायचं असतं. तसेच चांगलं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना बरोबर घ्यायचं असतं. लोकसभेच्या पराभवानंतर मी देखील पूर्वीच्या स्वभावात काही बदल केला. जरा हसायला सुरुवात केली. लोकांमध्ये मिसाळायला सुरुवात केली. दररोज घरातून बाहेर पडताना मी ठरवायचो की आज कोणावरही चिडायचं नाही. असं ठरवून ज्या ठिकाणी सभा असतील त्या ठिकाणी जायचो. जेव्हा तुमच्यावर एखादी जबाबदारी असते त्या व्यक्तींने जबाबदारीचं भान ठेवलं पाहिजे”, असं अजित पवारांनी सांगितलं.

Story img Loader