महाराष्ट्रामधील करोनाबाधितांची संख्या मागील काही दिवसांपासून सातत्याने वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. असं असतानाच आता पुन्हा एकदा नव्याने निर्बंध लागू केले जाणार का? यासंदर्भात दबक्या आवाजामध्ये चर्चा सुरु झाली आहे. याचसंदर्भात आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईमधील पत्रकार परिषदेमध्ये महत्वाचं भाष्य केलं आहे. राज्यामध्ये पुन्हा मास्कसक्ती करण्याचा पुन्हा निर्णय घेतला जाईल का असं विचारण्यात आलं असता अजित पवार यांनी जर तरच्या भाषेमध्ये या प्रश्नाला उत्तर दिलं. सध्या वाढत्या करोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये पुन्हा एकदा मास्कसक्ती केली जाईल अशी जोरदार चर्चा असतानाच उपमुख्यमंत्र्यांनी याच संदर्भात सरकारचं धोरणं काय असेल याबद्दल सांगितलंय.
नक्की वाचा >> “ऑपरेशनला गेले आणि…”; मास्क न वापरण्यावरुन अजित पवारांचा राज ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा