मशिदींवरील भोंगे हटविणे, हनुमान चालीसावरून भाजपा मनसेला पुढे करीत असल्याचा आरोप केला जात असला तरी वस्तुस्थिती मात्र वेगळी वाटते. मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर डोळा ठेवूनच शिवसेनेला घेरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस मनसेचा वापर करून घेत असावी, अशी गुगली भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी ‘लोकसत्ता’च्या ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ या वेबसंवादात बोलताना टाकली. मनसेला राष्ट्रवादीची फूस असल्याच्या या टीकेवरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेलारांना अप्रत्यक्षपणे टोला लगावलाय.

नक्की वाचा >> योगी सरकारने ११ हजार धार्मिक स्थळांवरील भोंगे काढल्यासंदर्भात अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आपण महाराष्ट्रात…”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शेलार नेमकं काय म्हणाले?
‘लोकसत्ता’च्या ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ या वेबसंवादात बोलताना शेलार यांनी, “हनुमान चालीसा हा भाजपाचा कार्यक्रम नाही. पण हनुमान चालीसाच्या पठणाला कोणी रोखत असेल, तर त्याला भाजपाचा विरोध असेल. भाजपा हा हिंदूत्वाच्या विचारांचा पक्ष आहे. हिंदूत्व हे राष्ट्रीयत्व ही आमची भूमिका आहे. कोणत्याही जाती धर्मावर सक्ती केली जात नाही. तसेच विशिष्ट धर्माचे लांगूलचालन भाजपाला अभिप्रेत नाही,” असं स्पष्ट केलं.

नक्की वाचा >> शिवसेना, NCP, BJP युती होणार होती म्हणणाऱ्या आशिष शेलारांना अजित पवारांचा टोला; म्हणाले “ते मोठे नेते आहेत, त्यांच्याशी पवार साहेब…”

तसेच पुढे बोलताना, “राम मंदिर, रामसेतू, ३७० कलम रद्द करणे, नागरिकत्व सुधारणा कायदा आदी प्रमुख मुद्दय़ांवर भाजपाने नेहमीच स्पष्ट भूमिका घेतली आहे. भूमिका मांडण्यासाठी आम्हाला कोणालाही पुढे करण्याची आवश्यकता नाही,” असेही शेलार यांनी स्पष्ट केले. सर्वधर्मभावाच्या नावाखाली हिंदूंवर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही, असंही ते म्हणाले.

नक्की वाचा >> “आशिष शेलारांनी फडणवीसांवर टीका केलीय, भाजपाने तात्काळ त्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा चंद्रकांत पाटील…”; काँग्रेसची मागणी

भाजपा मनसेला पुढे करून आपला कार्यक्रम राबवित असल्याचा आरोप शेलार यांनी फेटाळून लावला. “मनसेच्या सर्व सभांना सर्वत्र परवानगी दिली जाते. मनसेबाबात वेगळी चर्चा कानावर येते. बहुधा राष्ट्रवादीचेच नेतृत्व मनसेचा वापर करून घेत असावे. मनसेला पुढे करून राष्ट्रवादी शिवसेनेची अडचण करीत असण्याची शक्यता नाकारता येत नाही,” असे मतही शेलार यांनी व्यक्त केले.

नक्की वाचा >> इंधनावरील कर कमी करण्याच्या मोदींच्या सल्ल्यावर अर्थमंत्री अजित पवार म्हणाले, “केंद्र सरकारने देखील पेट्रोल-डिझेलवर कर लावताना…”

अजित पवारांचं उत्तर
शेलार यांनी केलेल्या या वक्तव्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार यांनी यावर उत्तर दिलं. “मनसेला राष्ट्रवादी काँग्रेसची फूस असती तर राज ठाकरेंनी पवारसाहेबांना जातीयवादी म्हटले असते का? राज ठाकरे आज भाषणे करत असताना ते भाजपावर टीका करत नाही. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरच टीका करतात,” असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा >> राज ठाकरेंनी मानले योगींचे आभार; ठाकरे सरकावर खोचक शब्दात टीका करताना म्हणाले, “आमच्याकडे महाराष्ट्रात फक्त ‘भोगी’…”

“लोकसभेला मात्र त्यांचा (राज ठाकरेंचा) अजेंडा वेगळा होता. त्यावेळी त्यांनी फक्त भाजपाला टार्गेट केले होते. ही वस्तूस्थिती मान्य करावी लागेल. २०१९ ला आघाडीला अप्रत्यक्ष फायदा होईल, अशा पद्धतीने त्यांनी सभा घेतल्या होत्या,” याची आठवण अजित पवार यांनी करुन दिली.