Premium

महायुतीचं जागावाटप ठरलं? अजित पवारांचं सूचक विधान; म्हणाले, “विद्यमान जागा त्या त्या पक्षाला…!”

अजित पवार म्हणाले, “जागावाटपाची प्राथमिक चर्चा झाली आहे. तिन्ही पक्षांनी एकत्र बसून बोलणी केली. प्रत्येकाचा मान-सन्मान राखला जाईल असा तोडगा…”

ajit pawar on seat sharing (1)
महायुतीचा जागावाटपाचा नेमका फॉर्म्युला काय? (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

पुढच्या काही दिवसांमध्ये लोकसभा निवडणुकांची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच पक्षांमध्ये इच्छुक उमेदवार, जागावाटप याबाबत खलबतं चालू आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात नेमकं काय चित्र असेल? याची उत्सुकता राजकीय वर्तुळात दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या दोन्ही पक्षांमधून फुटून सत्तेत गेलेले गट महायुतीमध्ये आहेत. त्याचवेळी महाविकास आघाडीतही राजकीय महत्त्व आणि सध्याचं विद्यमान बलाबल याची सांगड घालण्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर महायुतीच्या जागावाटपाबाबत अजित पवार यांनी सूचक विधान केलं आहे.

“राजकीय सुसंस्कृतपणाचा आदर्श ठेवायला हवा”

दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या १११व्या जयंतीनिमित्ताने कराडच्या प्रीतीसंगम घाटावर अजित पवार उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी राजकारणातील सुसंस्कृतपणावर भाष्य केलं. “खऱ्या अर्थानं यशवंतराव चव्हाण यांनी राजकारणात सुसंस्कृतपणा कसा टिकवायचा असतो, सांभाळायचा असतो, काम करायचं असतं हे उभ्या महाराष्ट्राला दाखवलं. तोच आदर्श नव्या पिढीनं, आम्ही सगळ्यांनी ठेवला पाहिजे. अलिकडे वाचाळवीरांची संख्या वाढली आहे. काहीही बोलत असतात, कुणी खेकडा म्हणतं, कुणी वाघ म्हणतं. अशा गोष्टी थांबायला हव्यात”, असं अजित पवार म्हणाले.

Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
sharad pawar rain speech
Sharad Pawar: “मी बोलायला लागलो की पाऊस येतो आणि निकाल…”, शरद पवारांचं सूचक विधान; पावसातल्या ‘त्या’ सभेची पुन्हा चर्चा!
Devendra Fadnavis rally in rains
Devendra Fadnavis: शिराळा येथे देवेंद्र फडणवीस यांचे भरपावसात भाषण; म्हणाले, “पावसात सभा झाली की…”
david dhawan advice huma qureshi on weight
“तुला खूप लोक सांगतील वजन कमी कर, सर्जरी कर, पण…”, हुमा कुरेशीला प्रसिद्ध दिग्दर्शकाने वजनाबद्दल दिलेला सल्ला, म्हणाली…

जागावाटपाचं काय होणार?

दरम्यान, महायुतीच्या जागावाटपासंदर्भात सर्व मित्रपक्षांच्या दिल्ली-मुंबईत बैठका होताना दिसत आहेत. मंगळवारी महायुतीची दिल्लीत बैठक होणार असं सांगितलं जात असताना अजित पवारांनी मात्र त्याबाबत निश्चित काही ठरलेलं नसल्याचं नमूज केलं. “काल दिल्लीत बैठक होणार होती. पण कालची बैठक पुढे ढकलली आहे. ती आज किंवा उद्या होऊ शकते”, असं ते म्हणाले.Marathi News

“…म्हणजे मोदीच मोदींचे कायम उत्तराधिकारी राहतील”, ठाकरे गटाचं टीकास्र; अनंत हेगडेंच्या विधानाचा दिला संदर्भ!

“जागावाटपात प्रत्येकाचा सन्मान राखला जाईल”

“जागावाटपाची प्राथमिक चर्चा झाली आहे. तिन्ही पक्षांनी एकत्र बसून बोलणी केली. प्रत्येकाचा मान-सन्मान राखला जाईल, कार्यकर्त्यांना समाधान वाटेल असा तोडगा काढण्याचा प्रयत्न आमचा असेल. बहुतेक विद्यमान जागा त्या त्या पक्षाला सोडण्याची प्राथमिक चर्चा झालेली आहे. त्यासंदर्भात अंतिम चित्र आम्हालाही लवकरात लवकर स्पष्ट करावं लागणार आहे. १४-१५ तारखेला आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे”, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

विजय शिवतारेंचं अजित पवारांना आव्हान

दरम्यान, एकीकडे विजय शिवतारेंनी अजित पवारांना आव्हान दिलेलं असताना अजित पवारांनी मात्र त्यावर काहीही बोलायचं नसल्याचं नमूद केलं. “विजय शिवतारेंबाबत मला काहीच बोलायचं नाही. सुसंस्कृतपणा सगळ्यांनी दाखवावा. वरीष्ठ पातळीवर सगळे निर्णय घेतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भाजपा, शिवसेना, महायुतीतील इतर घटक पक्ष या सगळ्यांनी वातावरण खराब होईल असं कोणतंच विधान करू नये”, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ajit pawar on seat sharing formula of mahayuti for loksabha election 2024 pmw

First published on: 12-03-2024 at 09:27 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या