Ajit Pawar on Ladki Bahin Yojana : राज्यात लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यात अनेक अडचणी येत आहेत. परंतु, या अडचणींची तक्रार कुठे करावी हाच प्रश्न आहे. ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरण्यातही अडचणी येत असल्याने अनेक महिला या योजनेपासून वंचित राहिल्या आहेत. दरम्यान, अजित पवारांनी आज अंमळनेर येथील एका शेतावर जाऊन गावकऱ्यांशी संवाद साधला. या संवादात महिलांना बेरोजगारी आणि लाडकी बहीण योजनेशी संबंधित तक्रारींचा पाढा वाचला.
अजित पवार आणि महिलेमधील संवाद काय?
अजित पवार – माझी लाडकी बहीण योजना आणली. त्या योजनेचा फॉर्म भरला का?
महिला – भरलाय पण अॅक्स्पेप्ट केला नाहीय
अजित पवार – स्वीकारला गेला नाहीय? तुम्हाला १०० टक्के माहितेय की स्वीकारला गेला नाहीय.
महिला – कालच फॉर्म भरलाय.
अजित पवार – तुमची मुलं शाळेत जातात?
महिला – हो. एमए बीएड झालाय. तरी काम नाहीय. घरीच आहे. एक लहान मुलगी आहे तीही एम ए झालीय. पण घऱीच बसून आहेत. हाताला काम नाहीय.
अजित पवार – आता शिक्षक भरती सुरू केलीय.
महिला – सर्व भरतीला जातोय. पण कामच होत नाहीय.
अजित पवार – बरं, आम्ही तुमच्यासाठी चांगली योजना आणली आहे. त्याचा फायदा घ्या. आमदारसाहेब (अनिल पाटील) तुमचा पीए पाठवा आणि यांचा अर्ज का स्वीकारला गेला नाही, याची चौकशी करा.
१ जुलैपासून राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्या राबवण्यास सुरुवात केली. त्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. परंतु, अर्ज भरण्यासाठी असलेल्या संकेतस्थळावर सातत्याने तांत्रिक अडचणी येत असल्याने अर्ज प्रक्रिया रखडली आहे. अॅपवर अर्जनोंदणी तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आली असून संकेतस्थळावरून अर्ज करण्यास सांगण्यात येत आहे. परंतु, संकेतस्थळावरूनही वेगाने प्रक्रिया होत नसल्याने महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर, दुसरीकडे आज अंमळनेर येथे दौऱ्यावर असताना राज्यात बेरोजगारीचा उच्चांक वाढलेला असताना अजित पवारांनी त्यावर उत्तर देणं टाळलं अन् लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्याबाबत आवाहन केले.
तर, राज्यात आतापर्यंत १ कोटी ४५ लाख ७६ हजार ९१ महिलांनी केली नाव नोंदणी झाली असून. त्यापैकी १ कोटी ३४ लाख ३० हजार ७८४ अर्ज पात्र झाले आहेत, अशी माहिती आदिती तटकरे यांनी त्यांच्या अधिकृत एक्स खात्यावरून दिली.