राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार मागील काही दिवसांपासून पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे. आज सकाळपासून अजित पवारांच्या देवगीरी बंगल्यावर अजित पवार समर्थक आमदारांची बैठक सुरू होती. या बैठकीनंतर अजित पवार राजभवनावर दाखल झाले आहेत. आता अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळपास ३० आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होणार असल्याची माहिती मिळत आहे.

विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही राजभवनाच्या दिशेनं रवाना झाले आहेत. त्यामुळे पुढील काही तासांत अजित पवारांसह राष्ट्रवादीचे काही नेते मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी मला विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा आणि पक्ष संघटनेची जबाबदारी द्या, अशी मागणी अजित पवारांनी केली होती. त्यानंतर अजित पवार पक्षात नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या.

Maharashtra Assembly Election 2024
Mahayuti Politics : पक्ष शिंदे अन् अजित पवारांचे, उमेदवार मात्र भाजपाचे! फडणवीसांच्या ‘या’ पाच शिलेदारांकडून समन्वयाचं राजकारण
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
Sumit Wankhede Arvi Constituency, Sumit Wankhede,
भाग्य फळफळले! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दोन सचिवही निवडणुकीच्या रिंगणात
Eknath Shinde Candidates List
Shivsena Eknath Shinde Candidates List : शिंदेंच्या शिवसेनेतील २० उमेदवारांची नावे जाहीर; आदित्य ठाकरेंविरोधात खास मोहरा, आयारामांना संधी!
Uddhav Thackeray, candidates, Kalyan, Eknath Shinde, Shiv snea
कल्याण पट्ट्यातील ठाकरेंचे उमेदवार ठरले, शिंदेचे ‘आस्ते कदम’
Thane, Palghar, Eknath Shinde,
ठाणे, पालघरमध्ये शिंदे यांची भिस्त आयात उमेदवारांवर ?
Shiv Sena, Eknath Shinde, assembly election 2024, thane district
ठाणे जिल्ह्यात शिंदे यांच्या शिवसेनेचा उमेदवार ठरेना
Eknath shinde
शिंदे-फडणवीस यांची राज ठाकरेंबरोबर खलबते

अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी उत्सुक असल्याचं बोललं जात होतं. त्यासाठी अजित पवार आपल्या समर्थक आमदारांच्या वतीने पक्षावर दबाब टाकत होते, अशीही चर्चा सुरू होती. यानंतर आता अजित पवार राजभवनावर दाखल झाले आहेत. येत्या काही तासांत अजित पवारांसह राष्ट्रवादीचे अनेक बडे नेते शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील होणार आहे.