चिंचवड आणि कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. भारतीय जनता पार्टीसह महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार केला जात आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे अनेक नेते निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. प्रचार शिगेला पोहोचला असताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. चिंचवड येथे पार पडलेल्या एका बैठकीत ते बोलत होते.

अजित पवारांवर निशाणा साधताना बावनकुळे म्हणाले, “येत्या २६ तारखेला इतक्या जोरात ईव्हीएमचे बटण दाबा की ४४० व्होल्टचा करंट लागला पाहीजे. पुन्हा अजित पवारांनी चिचंवडचे नाव घेतले नाही पाहीजे, याची काळजी तुम्ही घ्या.”, असे आवाहन बावनकुळे यांनी केले. बावनकुळेंच्या या आवाहनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपरोधिक टोलेबाजी केली आहे. मला ४४० व्होल्टचा करंट लागला तर मी मरूनच जाईल, असं अजित पवारांनी म्हटलं. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

Dhananjay Chandrachud
D Y Chandrachud : “…तर मी तुम्हाला हाकलून देईन”, सरन्यायाधीशांनी ममता बॅनर्जींच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या याचिकाकर्त्याला सुनावलं
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
anna hazare arvind kejriwal
Anna Hazare : “मी त्यांना आधीच सांगितलेलं…”, केजरीवालांच्या राजीनाम्याच्या निर्णयावर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया
Anyone embezzling in Anand Dighe's ashram should be thoroughly investigated
आनंद दिघेंच्या आश्रमात ज्यांनी चुकीचे कृत्य केले त्यांना……शिंदे सेनेच्या मंत्र्याने थेटच सांगितले…
Ajit pawar and jitendra awhad
Jitendra Awhad : “एवढाच पश्चाताप होतोय तर…”, अजित पवारांच्या त्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाडांचं आव्हान, म्हणाले…
pm narendra modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितली जाहीर माफी, शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी खेद व्यक्त करताना म्हणाले…
shivsena thackaray
“पंतप्रधान मोदी ज्याला हात लावतात, ती वास्तू…”; शिवरायांचा पुतळा कोसळण्यावरून ठाकरे गटाचं टीकास्र; मुख्यमंत्र्यांनाही केलं लक्ष्य!
Congress is involve in dispute between two factions of BJP Nagpur news
भाजपच्या दोन गटातील वादात काँग्रेसची उडी, काय आहे प्रकार

हेही वाचा- ठाकरे गटाकडून नवीन चिन्हासाठी हालचाली; संजय राऊतांचं थेट विधान, म्हणाले…

चंद्रशेखर बावनकुळेंच्या विधानाबाबत विचारलं असता अजित पवार म्हणाले की, अरे बापरे… ४४० व्होल्टचा करंट म्हणजे मी मरून जाणार… एवढा मोठा करंट बसल्यावर मी कसा काय जगू शकतो? आता माझ्या मतदारांना आणि कार्यकर्त्यांना सगळ्यांना आता श्रद्धांजली अर्पण करावी लागेल की काय? अशी उपरोधिक टोलेबाजी अजित पवारांनी केली.

हेही वाचा- निवडणूक आयोगाच्या निकालावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “या निर्णयाविरोधात…”

अजित पवार पुढे म्हणाले, “त्या चंद्रशेखर बावनकुळेंना म्हणावं जरा बोलण्यात तारतम्य ठेवा. आपण एका सत्ताधारी पक्षाचे अध्यक्ष आहात. उगीच आपल्याला बोलण्याची संधी मिळाली म्हणून उचलली जीभ लावली टाळ्याला, असं करू नका. काहीतरी तारतम्य ठेवा. मानसिक संतुलन बिघडू देऊ नका.”