राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गुप्त भेट चांगलीच चर्चेत आहे. खासदार संजय राऊत यांनी या भेटीवर टीका केली. तर शरद पवार यांनी अजित पवार माझा पुतण्या आहे त्याला भेटलो तर चुकीचं काय असा सवाल केला आहे. अशात आता दस्तुरखुद्द अजित पवार यांनीच या भेटीबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. शरद पवार हे आमचे कुटुंबप्रमुख आहेत असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले अजित पवार?

शरद पवार हे आमचे कुटुंबप्रमुख आहेत. या बैठकीला राजकीय रंग देऊ नका. मी नात्यानं शरद पवार यांचा पुतण्या आहे. आमच्या भेटीला राजकीय रंग का दिला जातो आहे? असा प्रश्न अजित पवार यांनी कोल्हापुरात विचारला. तसंच मी कुठेही लपून गेलो नव्हतो असंही त्यांनी म्हटलं आहे.

maharashtra assembly elections
२०१९ च्या त्या बैठकीत काय घडलं? कथित सत्तांतर घडवणारी बैठक कधी, केव्हा, कुठे झाली होती?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Devendra Fadnavis, Mahesh Landge,
“महेश लांडगे यांचा कुणी बालही बाका करू शकत नाही”, असं देवेंद्र फडणवीस का म्हणाले?
Anshula Kapoor talks about parents Boney Kapoor Mona Kapoor divorce
“माझे आई-वडील वेगळे झाल्यावर…”, पालकांच्या घटस्फोटाबाबत पहिल्यांदाच बोलली जान्हवी कपूरची सावत्र बहीण
Sharad Pawar On Ajit Pawar
Sharad Pawar : शरद पवारांकडून अजित पवारांची पुन्हा नक्कल अन् सभेत एकच हशा; म्हणाले, “काही माणसं…”
Sharad Pawar on Gautam Adani meeting
Sharad Pawar: “होय, बैठक झाली होती, पण…”, NCP-BJP एकत्र येण्यासाठी अदाणींच्या घरी बैठक; अजित पवारांच्या दाव्यावर शरद पवार म्हणाले…
Sunil Tatkare on Jayant Patil
“जयंत पाटील आतल्या गाठीचे, त्यांनी…”, अजित पवार गटाकडून टीका; म्हणाले, ‘यावेळी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार’
sharad pawar reaction on bjp batenge to katenge slogan
नाव घेतले तर न्यायाल्यात खेचीन ‘ कोणी ‘ पाठविली शरद पवार यांना नोटीस !

मी कुठेही लपून गेलो नाही

मी कुठेही लपून गेलो नाही असंही अजित पवार म्हणाले. मी कधी लपून कुणाला भेटायला गेलो? असा प्रश्न अजित पवारांनी उपस्थित केला. चोरडिया आणि आमचं दोन पिढ्याचं नातं आहे. चोरडिया हे शरद पवार यांचे वर्गमित्र आहेत. त्यांनी शरद पवार यांना जेवायला बोलवलं होतं. त्यावेळी जयंत पाटीलही त्या ठिकाणी शरद पवारांबरोबर होते. दोन पिढ्या ओळखीच्या माणसाच्या घरी भेटायला जाण्यात काय चूक आहे? उगाच काहीतरी गैरसमज निर्माण करण्याचं काम करु नये असं अजित पवार म्हणाले. मी ज्या कारमध्ये होतो त्या कारला अपघात झाला नव्हता. मी लपून कशाला कुठे जाऊ? मी उजळ माथ्याने फिरणारा आहे. असंही अजित पवार यांनी कोल्हापुरात पत्रकारांना सांगितलं.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे दुपारी उद्योगपती चोरडिया यांच्या बंगल्यावर होते. त्या ठिकाणी त्यांनी जेवणही केलं. शरद पवार यांच्यासोबत जयंत पाटीलही त्या ठिकाणी उपस्थित होते अशी चर्चा आहे. त्याचवेळी चांदणी चौकातील कार्यक्रम झाल्यानंतर अजित पवार हे सर्किट हाऊसवर न जाता दुसऱ्याच गाडीने चोरडिया यांच्या बंगल्यावर गेले. अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये यावेळी दीर्घ चर्चा झाल्याचं स्पष्ट होत आहे. त्यानंतर विविध चर्चा होऊ लागल्या होत्या. आता अजित पवार यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.