महाराष्ट्रासह देशातले लोकसभेचे निकाल जाहीर झाले आहेत. महाराष्ट्रात महायुतीच्या अवघ्या १७ जागा आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या ४५ पेक्षा जास्त जागा निवडून येतील असा दावा सुरुवातीला केला गेला. मात्र निवडणुकीच्या फेऱ्या आणि विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या दाव्यांनी ४५ प्लसच्या दाव्यातली हवा काढली. अजित पवार यांनी प्रतिष्ठेची केलेली बारामतीची निवडणूकही ते जिंकू शकले नाहीत. अजित पवार गटला लोकसभा निवडणुकीत रायगडचीच जागा जिंकता आली आहे. यानंतर अजित पवारांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र या निवडणुकीत त्यांना यश मिळालं नाही. मात्र निवडणुकीत त्यांना यश मिळालं नाही. यानंतर अजित पवारांनी मोठा निर्णय घेतला आहे.
अजित पवारांनी काय निर्णय घेतला?
अजित पवारांनी बारामती तालुका कुस्तीगीर परिषदेच्या सदस्यांची बैठक बोलवली. त्यानंतर त्यांनी बारामती कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदावरुन युगेंद्र पवारांना दूर करण्याचा निर्णय घेतला. बैठकीला उपस्थित न राहिल्याचं कारण कुस्तीगीर परिषदेने दिलं. त्यानंतर अजित पवारांनी हा निर्णय घेतला. अशी माहिती समोर येते आहे. या निर्णयाबाबत युगेंद्र पवार आणि शरद पवार गट काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
युगेंद्र पवार यांचं म्हणणं काय?
“या निर्णयाबाबत माहिती नाही. मला कुणीही अध्यक्षपदावरुन हटवलं आहे हे अधिकृतरित्या सांगितलेलं नाही. कुस्तीगीर परिषदेची बैठक झाली त्यात काहीतरी निर्णय झाला आहे. अशी माहिती माझ्याकडे आहे.” असं युगेंद्र पवार यांनी एबीपी माझाला सांगितलं.
हे पण वाचा- Lok Sabha Election Result: बारामतीतल्या पराभवानंतर सुनेत्रा पवारांची पोस्ट, “निकाल अनपेक्षित….”
४ जूनच्या निकालात सुनेत्रा पवारांचा पराभव
लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागला. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे पुन्हा एकदा निवडून आल्या. सुप्रिया सुळेंचा हा सलग चौथा विजय आहे. त्यांना त्यांच्या वहिनी आणि अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचं आव्हान होतं. मात्र सुनेत्रा पवार यांचा सुप्रिया सुळेंनी पराभव केला.
पवार कुटुंबात कटुता
लोकसभा निवडणुकीच्या आधी पवार कुटुंबात कटुता निर्माण झाल्याचं दिसलं. शरद पवार हे कुटुंबातल्या इतर सदस्यांना घेऊन प्रचार करत होते. अजित पवार यांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचा प्रचार केला. मतदानाच्या दिवशी ते आईबरोबर मतदानाला आले होते. आई आमच्या घरात ज्येष्ठ आहे आणि आमच्या बरोबर आहे असंही त्यांनी सांगितलं होतं. मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळेंनी अजित पवारांच्या आईची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. पवार कुटुंबातली कटुता त्यांच्याकडून कमी करण्याचा प्रयत्न सुप्रिया सुळेंनी केला होता. आता निवडणुकीचे निकाल लागताच अवघ्या ४८ तासांच्या आत युगेंद्र पवारांना कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदावरुन अजित पवारांनी हटवल्याची माहिती आहे. त्यामुळे पवार कुटुंबातला संघर्ष आणखी वाढणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
© IE Online Media Services (P) Ltd