राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यकारी अध्यक्षांची निवड करणे, याला भाकरी फिरवणे म्हणतात, असं मला वाटत नाही. ही निव्वळ धूळफेक आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. “राष्ट्रवादीने काय करावं, हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे,” असं अजित पवारांनी म्हटलं आहे. ते साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यकारी अध्यक्षांची निवड करणे याला भाकरी फिरवणे म्हणतात, असं मला वाटत नाही. ही तर निव्वळ धूळफेक आहे. राष्ट्रवादीतील फेरबदल किंवा अजित पवार नाराज असणे, हा त्यांच्या पक्षांतर्गत विषय आहे. मात्र, याला भाकरी फिरवणे म्हणत नाही. तर ही धुळफेक आहे. तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे.”

What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
devendra fadnavis chhagan bhujbal ajit pawar
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस अजित पवारांचं नाव घेत म्हणाले, “छगन भुजबळांना मंत्रिमंडळात घेतलं नाही त्यामागे…”
Ajit Pawar On Chhagan Bhujbal Devendra Fadnavis Meet
Ajit Pawar : भुजबळ-फडणवीसांच्या भेटीवर अजित पवारांचं मोठं विधान; उपायाबाबत म्हणाले, “आम्ही आमच्या पद्धतीने…”!
nitin raut Devendra fadnavis
गुंडांना खुद्द मुख्यमंत्र्यांचे संरक्षण, डॉ. नितीन राऊत म्हणाले…
Chhagan Bhujbal
“ज्या प्रकारे अवहेलना करण्यात आली…”, छगन भुजबळांची उद्विग्न प्रतिक्रिया; अजित पवार व पक्षावरील नाराजी व्यक्त करत म्हणाले…
Dilip Walse Patil
Dilip Walse Patil : मंत्रिपद न मिळाल्याने नाराज आहात का? दिलीप वळसे पाटलांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; भुजबळांबाबतही केलं मोठं भाष्य
Devendra fadnavis opposition
“हव्या त्या विषयावर चर्चेसाठी तयार, विरोधकांनी उगाच राजकारण करू नये…”, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्युत्तर

हेही वाचा : रेल्वे सुरक्षा निधीचा वापर मसाज मशिन, फर्निचर खरेदीसाठी, सुप्रिया सुळे मोदी सरकारवर संतापल्या; म्हणाल्या….

“भाकरी फिरवली हे माध्यमांनी चालवलं”

याबद्दल अजित पवार यांना विचारल्यावर ते म्हणाले, “शरद पवार भाकरी फिरवण्याबद्दल काही बोलले का? भाकरी फिरवली हे माध्यमांनी चालवलं. देवेंद्र फडणवीस एका राष्ट्रीय पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांनी काय म्हणावं, हा त्यांचा अधिकार आहे. पण, पक्षांतर्गत भाजपाने काय करावं, हा त्यांचा प्रश्न आहे. तसा राष्ट्रवादीने काय करावं, हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे.”

हेही वाचा : “होय, ही घराणेशाहीच, मी शरद पवार अन्…”, विरोधकांच्या आरोपांना सुप्रिया सुळेंचं सडेतोड प्रत्युत्तर

“फडणवीसांच्या बोलण्याला…”

“आमची आणि त्यांची विचारधारा वेगळी आहे. त्यामुळे टीका-टिप्पणी करणं त्यांचं काम आहे. फडणवीसांच्या बोलण्याला फार महत्वं दिलं पाहिजे, असं वाटत नाही,” असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

Story img Loader