देशात करोना विषाणूच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. करोनाच्या प्रकरणांसोबत देशात ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र आढळून येणाऱ्या लोकांमध्ये लक्षणे नसल्याने मोठ्या संख्येने अनेकांवर घरी उपचार केले जात आहेत. त्यामुळे आता लोक स्वतः करोना किटद्वारे घरीच चाचणी करत आहेत बाजारात उपलब्ध असलेल्या कोविड सेल्फ टेस्ट किटमुळे तुम्ही तुमच्या घरी अँटीजेन चाचणी करू शकता आणि तुम्ही पॉझिटिव्ह आहात की नाही हे काही वेळातच कळू शकते.

घरच्या घरी चाचण्या करता येणाऱ्या विविध अशा ११ चाचणी संचांना भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने मान्यता दिली आहे. यातील जवळपास चार ते पाच प्रकारचे संच सध्या बाजारात उपलब्ध आहेत. या संचाची किंमत अडीचशे रुपये आहे. मात्र घरातल्या घरात केल्या जाणाऱ्या चाचण्यांच्या अहवालांची ‘आयसीएमआर’च्या संकेतस्थळावर नोंद करणे अपेक्षित आहे. पण, बहुतांश नागरिक हे करणे टाळतात व परस्पर उपचार घेतात. त्यामुळे दैनंदिन रुग्णसंख्या आहे त्यापेक्षा अधिक असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Devendra Fadnavis On Maharashtra Vidhan Sabha Exit Poll
Devendra Fadnavis : राज्यात महायुतीचं सरकार येणार? एक्झिट पोल्सच्या अंदाजावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, “भाजपा…”
Vidhan Sabha Election Exit Poll Result
Maharashtra Exit Poll Updates: लोकसभेला एग्झिट पोलचे अंदाज…
Independent candidate died in Beed, Beed,
बीडमध्ये अपक्ष उमेदवाराचा मृत्यू
Mahayuti vs MVA Exit Poll
Mahayuti vs MVA Exit Poll : राज्यात भाजपा ठरणार सर्वात मोठा पक्ष तर ‘मविआ’त क्रमांक एकचा पक्ष कोणता? एक्झिट पोल्सचा अंदाज काय?
maharashtra weather forecast for the week cold in nashik
नाशिक गारठले; जाणून घ्या, आठवडभराचा थंडीचा अंदाज
Maharashtra Vidhan Sabha Election Exit Poll Results 2024
Maharashtra Exit Poll Updates: राष्ट्रीय पक्षांचा राज्यात झगडा; काँग्रेस की भाजपा? मतदार नेमके कुणाच्या पाठीशी? वाचा एग्झिट पोलचे अंदाज!
Uddhav Thackeray Shivsena vs Eknath Shinde Shivsena in Marathi
Uddhav Thackeray Shivsena vs Eknath Shinde Shivsena Exit Poll Updates: जनतेनं कोणत्या शिवसेनेला निवडलं? एक्झिट पोलच्या अंदाजानुसार पसंती कुणाला?
Ajit Pawar NCP vs Sharad Pawar NCP Exit Poll Updates in Marathi
Ajit Pawar NCP vs Sharad Pawar NCP Exit Poll Updates: शरद पवार की अजित पवार? एग्झिट पोलनुसार मतदारांची साथ कुणाला? वाचा सर्व अंदाज!
Maharashtra Vidhan Sabha Election Exit Poll
Mahayuti vs MVA Exit Poll Updates : महाराष्ट्रात महायुती की मविआची सत्ता येणार? एक्झिट पोल्सचे अंदाज काय? वाचा!

पालकमंत्री आमदारांना भेटत नाही म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना अजित पवारांचं उत्तर म्हणाले, “उजाडलं पण नव्हतं…”

त्यामुळे आता राज्य सरकारने चाचणी अहवाल कळवणे बंधनकारक केले आहेत. तसेच विक्री याची करणाऱ्यांना ग्राहकांची माहिती घेणेही बंधनकारक आहे. मात्र या निर्णयावरुन दुकानदारांनी नाराजी दर्शवली असून दुकानांमध्ये इतर ग्राहक असल्याने हे करण्यात अडचणी येत असल्याचे म्हटले आहे. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“ज्या मेडिकलमधून तुम्ही टेस्टिंग किट घेता त्यांना ग्राहकांचे नंबर घेण्यास सांगितले आहेत. सुरुवातीला करोनाचे संकट आल्यावर भीती निर्माण झाली होती. त्यावेळी जास्त माहिती नसल्यामुळे लोक आपल्या मनाचे सांगत होते. आता मात्र घरामध्ये कोणाला करोना झाला तर बाकीच्यांची पण चाचणी करता येते. मुंबई, पुण्यासारख्या शहरी भागांमध्ये हे जास्त पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोविड सेल्फ टेस्ट किट घेतलेल्या आपण फोन करुन त्यांच्याकडून माहिती घेतो,” असे अजित पवार म्हणाले.

“मेडिकलवाल्यांनी ग्राहकांची माहिती म्हणजे फक्त फोन नंबर घ्यायचे आहेत. नोटा मोजायला कसा वेळ मिळतो तसाच नंबर घ्यायचा आहे. दहा आकडी नंबर आहे. हे बंधनकारक ठेवायला पाहिजे,” असेही अजित पवारांनी स्पष्ट केले.

“निवडणुकीआधी मीच चर्चा करुन त्यांना..”; अमोल कोल्हेंच्या नथुराम गोडसेच्या भूमिकेवरुन अजित पवारांची प्रतिक्रिया

दरम्यान, या चाचणीत बाधित आढळलेल्या रुग्णांची नोंदणी होत नसल्याने संसर्ग प्रसाराचा धोका वाढत असल्याचे म्हणत आता या संचाविक्रीसाठी मुंबई महानगर पालिकेकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या नियमावलीनुसार, उत्पादक, वितरक, औषध विक्रेते आणि रुग्णालयाकडून विक्रीची माहिती घेत रुग्णांना शोध घेण्यात येणार आहे. तर बाजारात उपलब्ध असलेल्या चाचणी संचाद्वारे केलेल्या चाचणीत करोनाबाधित आढळलेल्या रुग्णांची पुन्हा चाचणी करण्याची आवश्यकता नाही, असे केंद्रीय आरोग्य विभागाने सोमवारी स्पष्ट केले. परंतु अशा रुग्णांना उपचारासाठी दाखल करायचे असल्यास गृह चाचणी ग्राह्य न धरता त्यांच्या पुन्हा चाचण्या करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे.