सोलापूर : विधानसभा निवडणुकीत सत्ता राखण्यासाठी महायुतीने कंबर कसली असताना याच महायुतीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करमाळा विधानसभा निवडणुकीत महायुतीऐवजी तेथील अपक्ष आमदार संजय शिंदे यांना निवडून आणण्याचे आवाहन जाहीरपणे केले आहे.

मोहोळ आणि माढा या दोन्ही विधानसभा जागांसाठी पक्षाच्या प्रचारार्थ मोहोळमध्ये आयोजित केलेल्या सभेत अजित पवार यांनी करमाळा मतदारसंघात अपक्ष आमदार संजय शिंदे यांचा पुरस्कार केला. करमाळा विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे दिग्विजय बागल हे उमेदवार असताना तेथील अपक्ष आमदार संजय शिंदे यांना निवडून देण्याचे आवाहन पवार यांनी केले. संजय शिंदे यांनी स्वतः आपणास भेटून आपण अपक्ष उभे राहत असल्याचे सांगून आपली परवानगी घेतली. त्यांचे चिन्ह सफरचंद आहे. त्यांना निवडून आणायचे आहे, अशा शब्दांत अजित पवार यांनी अपक्ष संजय शिंदे यांच्या उमेदवारीचे समर्थन केले. मात्र याचवेळी माढ्याचे ज्येष्ठ आमदार बबनराव शिंदे यांनी आपली साथ सोडून, पुत्र रणजित शिंदे यांना पक्षाच्या घड्याळ चिन्हाऐवजी अपक्ष उमेदवार म्हणून रणांगणात उतरविल्याबद्दल पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

Deputy Chief Minister Eknath Shinde consoled the family of Raghunath More thane news
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रघुनाथ मोरे यांच्या कुटुंबियांचे केले सांत्वन
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
rahul gandhi rajnath singh
Rahul Gandhi: काँग्रेसचं अनोखं आंदोलन, संरक्षण मंत्र्यांसह सत्ताधारी खासदारांना दिलं गुलाबाचं फूल आणि राष्ट्रध्वज!
Sharad pawar on eknath shinde
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंकडून शरद पवारांना खुलं आव्हान, ईव्हीएमच्या मुद्द्यावरून म्हणाले…
DCM Eknath Shinde first Reaction
Eknath Shinde: “आधी मी CM म्हणजेच ‘कॉमन मॅन’ होतो, आता DCM…”, शपथविधीनंतर एकनाथ शिंदेंचं मोठं विधान
eknath shinde uday samant
Eknath Shinde Oath: एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदासाठी इतर नावांचा विचार करत होते? उदय सामंत यांच्या विधानामुळे चर्चा!
Amit Shah likely to meet Eknath Shinde
Amit Shah : देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधी सोहळ्याआधी अमित शाह एकनाथ शिंदेंची भेट घेणार? काय माहिती समोर?
Eknath Shinde Ramdas Athawale
Eknath Shinde : “शिंदे उपमुख्यमंत्री होणार”, महायुतीच्या बैठकीतील माहिती देत आठवले म्हणाले, “फडणवीसांनीच सांगितलंय…”

हेही वाचा – मोदींची सत्ता गेल्यावरच देशात ‘अच्छे दिन’ – सिद्धरामय्या

हेही वाचा – राज ठाकरेंनी सांगितली लोकसभेत भाजपाच्या पीछेहाटीची दोन कारणं; म्हणाले, “तेव्हा भाजपाचा एक उमेदवार…”!

u

विधानसभा निवडणुकीत भाजपकडून ‘बटेंगे तो कटेंगे’ चा दिला जाणारा इशारावजा नारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा स्पष्टपणे अमान्य केला. हा नारा छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात बिल्कुल चालणार नाही, असे स्पष्टपणे सुनावत पवार यांनी, अशा मुद्द्यावर दलित, आदिवासी, मुस्लिम समाजानेही घाबरू नये, असे आवाहन केले.

Story img Loader