राज्यात सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षावरुन राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षाविरोधात बंड पुकारल्याने राज्यामधील महाविकास आघाडी सरकार पडण्याची भिती व्यक्त केली जात आहे. या बंडामागे भाजपा असल्याचे आरोप शिवसेनेकडून केले जात आहेत. असं असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यशंवतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवारांनी या बंडामागे भाजपा आहे का यासंदर्भातील प्रश्नावर उत्तर दिलंय.

नक्की वाचा >> ‘संजय राऊत प्रत्यक्षात..’, ‘मंत्रीपद नको पण..’, ‘माझे पुतळे का..’, ‘अन्यथा मी..’; कॉलदरम्यान शिंदेंकडून मुख्यमंत्र्यांवर प्रश्नांचा भडिमार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकनाथ शिंदे यांना मागील दोन दिवसांमध्ये ४६ आमदारांनी समर्थन दर्शवलं आहे. शिंदे हे मंगळवारी काही बंडखोर आमदारांसोबत सुरतला गेले. त्यानंतर बुधवारी पहाटे ते बंडखोर आमदारांसोबत गुवहाटीमध्ये दाखल झाले. सध्या हे सर्व आमदार गुवहाटीमध्येच असून ठाकरे सरकार अल्पमतात जाण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर सकाळपासून मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन बैठकी पार पडल्यानंतर सायंकाळी शरद पवारांनी यशंवतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची बैठक घेतली. या बैठकीनंतर पत्राकारांशी बोलताना अजित पवारांना या बंडामागे भाजपा आहे असं वाटतं का असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना, “अजून तरी तसं काही दिसलं नाही,” असं म्हटलंय.

नक्की वाचा >> “अजित पवारांसारखं एकनाथ शिंदेंचं बंड फसणार नाही, कारण…”; आठवलेंचं वक्तव्य, कविताही केली सादर

पत्रकार परिषदेमध्ये पुन्हा एकदा हाच प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला तेव्हा त्यांनी, “आताच्या घडीला कुठलाही भाजपाचा नेता किंवा मोठा चेहरा तिथं येऊन काही करतोय असं दिसत नाही,” असं अजित पवारांनी स्पष्टपणे सांगितलं. तसेच पुढे बोलताना सरकारचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आमचा पाठिंबा अगदी शेवटच्या क्षणापर्यंत राहणार आहे. हे सरकार टीकवण्याचीच आमची भूमिका शेवटपर्यंत राहील असं अजित पवारांनी सांगितलं.