राज्यातील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच अयोध्या दौऱ्यावर गेले आहेत. याआधी एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला होता. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अजित पवार म्हणाले की, आताच्या ताज्या प्रश्नांवरून लोकांना विचलित करण्याची मुख्यमंत्र्यांची ही फालतुगिरी आहे. आमच्यावर निशाणा साधला म्हणजे आमच्या अंगाला भोकं पडत नाहीत.

अजित पवार हे सातारा जिल्हा दौऱ्यावर असून सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकांची त्यांनी बैठक घेतली. यावेळी माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी कोणी ट्विटरवरुन आमच्यावर निशाणा साधला म्हणजे आमच्या अंगाला भोकं पडत नाहीत. प्रत्येकाच्या ट्विटला उत्तर देण्यासाठी मी बांधील नाही. असे तर रोज हौसे, नौसे, गौसे ट्विट करत राहणार त्यांना उत्तर देण्यास आम्ही बांधील नाही.

Maharashtra Disaster Management Authority Mahayuti govt
महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणात एकनाथ शिंदेंऐवजी अजित पवारांची निवड; महायुतीत नाराजी कायम?
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Uddhav Thackeray and Eknath Shinde
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला, “काही मिळालं नाही की तू गावात जाऊन बसतोस आणि रेडा कापतोस…”
Chandrakant Patil demand to Deputy Chief Minister Eknath Shinde regarding the traffic congestion problem Pune news
अजित पवारांपाठोपाठ चंद्रकांतदादा भेटले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली ही मागणी !
Shiv Sena mouthpiece claims tension between Fadnavis and Shinde
एसटी महामंडळातील नियुक्तीवरून मुख्यमंत्र्यांची शिंदे गटावर कुरघोडी
Image Of Ajit Pawa
“महायुतीच्या बातम्या नीट द्या नाहीतर…”, हातात AK47 घेत अजित पवारांची मिश्किल टिप्पणी
Sanjay Shirsat On Shivsena
Sanjay Shirsat : एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंबाबत शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, ‘संधी मिळाल्यास दोन्ही शिवसेना…’
Deputy Chief Minister Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray jejuri pune news
ज्यांनी विचार सोडले, त्यांना जनतेने थारा दिला नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्यावरून पवार म्हणाले की, प्रत्येकाला तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाण्याचा अधिकार आहे. तसेच, मुख्यमंत्री हे अयोध्येला रामाच्या दर्शनासाठी गेले आहेत. मात्र, आम्ही कधी इकडे जाणार, तिकडे जाणार असं काही सांगत नाही. जातीचा, धर्माचा वापर माणसांमध्ये फूट पाडण्यात, द्वेष पसरवण्यात कोणी करू नये, एवढीच आमची अपेक्षा आहे.

हे ही वाचा >> “सत्ताधाऱ्यांची श्रद्धा अयोध्येत, तर आमची…”, शरद पवारांचे नाशिकमध्ये विधान

ताज्या प्रश्नांना डायव्हर्ट करण्याची मुख्यमंत्र्यांची ही फालतुगिरी : अजित पवार

अजित पवार म्हणाले की, “यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळावर सकाळी सात ते संध्याकाळी सात या वेळेत पाणी न पिता आत्मक्लेश केला हे कुठल्या जाहीर भाषणांमध्ये मी वक्तव्य केलं होतं का? मी केलेले वक्तव्य चुकीचंच होतं. परंतु, घोंगडी बैठकीमध्ये तशा पद्धतीने वाक्य जायला नको होतं त्याबाबत मी आत्मक्लेश केलेला आहे.” दरम्यान, तेच तेच काढून बेरोजगारी आणि महागाई कमी होणार आहे का? असा सवाल अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांना केला. तसेच आत्ताच्या ताज्या प्रश्नांना डायव्हर्ट करण्याची मुख्यमंत्र्यांची ही फालतुगिरी असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

Story img Loader