Ajit Pawar on Mahavikas Aghadi MLA’s Oath as a Maharashtra Legislative assembly Member : महायुती सरकारचा शपथविधी सोहळा दोन दिवसांपूर्वी संपन्न झाला असून तीन मंत्र्यांचं सरकार कामाला लागलं आहे. पाठोपाठ या सरकारने विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. आज (७ डिसेंबर) विधान भवनात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडला. मात्र, महाविकास आघाडीमधील एकाही आमदाराने आज विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली नाही. महायुतीने ईव्हीएममध्ये घोळ करून हा विजय मिळवला असल्याचा दावा करत विरोधकांनी शपथविधीवर बहिष्कार टाकला. तसेच महायुतीच्या विजयाचा निषेध नोंदवला. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांच्या या आंदोलनावरून त्यांच्यावर टीका केली आहे. तसेच “विधानसभेतील आमचा विजय हा ईव्हीएमचा विजय असं विरोधकांचं म्हणणं म्हणजे त्यांचा रडीचा डाव आहे”, असंही अजित पवार म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा