दिल्लीत संसदेचं हिवाळी अधिवेशन चालू असताना नागपुरात महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सत्ताधारी व विरोधक अधिवेशनाच्या निमित्ताने आमने-सामने आल्याचं नागपुरात दिसत आहे. या पार्श्वभूमीवर ऐन अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी जाणार असल्याचं जाहीर झालं. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. यावरून तर्क-वितर्कांना उधाण आलेलं असतानाच हा दौरा अचानक पुढे ढकलण्यात आला आहे. यासंदर्भात खुद्द अजित पवार यांनी खुलासा केला आहे.

आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालासाठी सर्वोच्च न्यायालयाने ३१ डिसेंबर ही अंतिम मुदत दिली आहे. ही तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशा राजकीय घडामोडी आणि त्यांचे लावले जाणारे अर्थ यामध्ये वेगाने बदल घडताना दिसत आहेत. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यावरूनही यामुळेच तर्क-वितर्कांना उधाण आलं होतं. मात्र, आता हा दौरा खुद्द अमित शाह यांनीच पुढे ढकलल्याची माहिती अजित पवारांनी पत्रकांनाशी बोलताना दिली. त्यामुळे यावरून आता चर्चा सुरू झाली आहे.

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
sharad pawar rain speech
Sharad Pawar: “मी बोलायला लागलो की पाऊस येतो आणि निकाल…”, शरद पवारांचं सूचक विधान; पावसातल्या ‘त्या’ सभेची पुन्हा चर्चा!
salman khan reacted on aishwarya rai abhishek bachchan marriage
ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनशी लग्न केल्यानंतर सलमान खान म्हणालेला, “माझ्या आयुष्याचा एक…”
sana malik
Sana Malik : “नवाब मलिक तुरुंगात असताना पक्षातील लोकांनी…”, सना मलिक यांचा गंभीर आरोप!
NCP Ajit Pawar group
Nawab Malik : “आम्ही किंगमेकर राहणार, आमच्याशिवाय कोणतंही सरकार…”, अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं विधान
What Sanjay Raut Said?
Sanjay Raut : “काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं बाळासाहेबांवर अधिक प्रेम आणि..”, संजय राऊत काय म्हणाले?
saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”

काय म्हणाले अजित पवार?

अजित पवारांनी यावेळी दिल्ली दौरा रद्द होण्यामागचं कारण सांगितलं. “मी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, दिलीप वळसे पाटील असे आम्ही सगळे दिल्लीला जाणार होतो. अमित शाहांनी रात्री आम्हाला भेटीची वेळ दिली होती. पण आत्ताच त्यांचा निरोप आला की आज त्यांना काही महत्त्वाची कामं निघाली. त्यामुळे आमचा आजचा दिल्लीचा दौरा पुढे ढकलावा लागला आहे. आता ते आम्हाला सोमवारी किंवा मंगळवारी भेटीची वेळ देतो असं म्हणाले आहेत”, असं अजित पवार म्हणाले.

“संसदेतील या हल्ल्यामागेही पंडित नेहरू…”, ठाकरे गटाचं मोदी-शाहांवर शरसंधान; म्हणे, “खासदार मुस्लीम असता तर…”

मंत्रिमंडळात पाच प्रमुख विषयांवर चर्चा

दरम्यान, अमित शाह यांच्याबरोबर नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा करायची? यावर राज्य मंत्रिमंडळ बैठकीत एकूण ५ मुद्दे केंद्रस्थानी होते, असं अजित पवार म्हणाले. “पाच बाबतींत आम्ही काल मंत्रिमंडळात चर्चा केली. त्यात कांद्याचा प्रश्न, इथेनॉलचा प्रश्न, विदर्भ विकास मंडळ- मराठवाडा विकास मंडळ आणि उर्वरीत महाराष्ट्र विकास महामंडळ यासंदर्भातला गृहमंत्रालयाकडे गेलेला प्रस्ताव हे मुद्दे आहेत. त्याबाबत आम्ही गृहमंत्र्यांची भेट घेणार होतो”, असंही अजित पवारांनी सांगितलं.

“सगळ्यांना माहिती आहे की शनिवार-रविवार सुट्टी असते. मी अमित शाह यांना म्हणालो की सोमवारी बैठकीचं नियोजन झालं तर बरं होईल. आम्हाला ते सोयीचं होईल. ते म्हणाले की सोमवारी वेळ देण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे आमचा आजचा दौरा आम्ही पुढे ढकलला आहे”, अशी माहिती अजित पवार यांनी माध्यमांना दिली.