नरेंद्र मोदी यांनी काल (रविवार, ९ जून) पंतप्रधानपदाची तर भाजपासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) विविध पक्षांमधील ७१ खासदारांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र एनडीएतील घटकपक्ष असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकही मंत्रिपद दिलेलं नाही. त्यामुळे अजित पवार आणि त्यांचा पक्ष एनडीएवर नाराज असल्याची चर्चा रंगू लागली आहे. तसेच मंत्रिपदावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटात अंतर्गत वाद असल्याचीही अफवा उडाली होती. यावर स्वतः पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही वेळापूर्वी स्पष्टीकरण दिलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित मेळाव्यात बोलत होते.

अजित पवार म्हणाले, काल मी दिल्लीत होतो. माझ्याबरोबर प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, संजय बनसोडे आणि समीर भुजबळ हे सर्व नेते उपस्थित होते. आम्ही काल दिवसभर एकत्र होतो. बऱ्याच विषयांवर आम्ही चर्चा केली. या चर्चेनंतर मी सर्वांना ठामपणे सांगतो की पक्षात किंवा महायुतीत कुठेही मतभेद नाहीत. कारण नसताना प्रसारमाध्यमे कधीकधी वेगवेगळ्या बातम्या दाखवतात, त्यातून अफवा पसरतात. त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा. प्रसारमाध्यमांशी फार संवाद साधला तर त्यातून वेगवेगळ्या बातम्या आणि गैरसमज पसरतात आणि आम्ही प्रसारमाध्यमांशी बातचीत केली नाही तर त्यांना असं वाटतं आमच्याशी बोलत नाहीत. मग ते त्यांना हव्या तशा बातम्या लावत सुटतात. कालही आपल्या पक्षाबद्दल काही बातम्या पसरवल्या गेल्या. त्यानंतर आपले महायुतीतील सहकारी देवेंद्र फडणवीस यांनी वस्तूस्थिती सांगितली आणि अफवांचा खंडन केलं.

Yogesh Kadam On Sanjay Shirsat :
Yogesh Kadam : शिवसेनेच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली? “संजय शिरसाट काय म्हणतात त्याला महायुतीत महत्त्व नाही”, योगेश कदमांचं विधान
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
Dhananjay Munde statement that resign if ordered by the party leader
पक्षनेतृत्वाने आदेश दिल्यास पदत्याग! धनंजय मुंडे यांची स्पष्टोक्ती
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : सुरेश धस सगळा हिशेब मांडत म्हणाले, “धनंजय मुंडे पालकमंत्री असताना ७३ कोटी…”
Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”

अजित पवार म्हणाले, मी सर्वांना ठामपणे सांगतो की मी भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा, अमित शाह, राजनाथ सिंह यांच्याशी सातत्याने चर्चा करत असतो. एनडीएची पहिली बैठक झाली तेव्हा नरेंद्र मोदी यांनी आम्हाला सांगितलं की एनडीएबरोबर यावेळी अनेक पक्ष आहेत, त्यामुळे मला प्रत्येकालाच वेळ देता येईल की नाही हे सांगता येणार नाही. त्यामुळे हे तिघेजण म्हणजेच नड्डा, शाह आणि राजनाथ सिंह सर्वांचं म्हणणं ऐकून घेतील, तुम्हाला वेळ देतील. त्याप्रमाणे आम्ही शाह, नड्डा आणि राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी या तिघांनी आम्हाला सांगितलं की तुमची लोकसभेची एकच जागा निवडून आली आहे तरी देखील आम्हाला तुम्हाला मंत्रिपद द्यायचं आहे. परंतु, तुम्हाला स्वतंत्र कारभार असलेलं राज्यमंत्रिपद द्यायचं आहे.

हे ही वाचा >> “भाजपाने आमच्याबरोबर दुजाभाव केला”, शिंदे गटाची खदखद; मंत्रिपदांवरून एनडीएत वाद पेटला?

अजित पवार म्हणाले, आपला राज्यसभेवर एक सदस्य आहे आणि लोकसभेवर सुनील तटकरेंच्या रुपात एक सदस्य आहेत. मी सर्वांना आत्ता विश्वास देऊ इच्छितो की येत्या जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा १५ ऑगस्टपर्यंत आपले राज्यसभेत तुम्हाला तीन सदस्य दिसतील. लोकसभेत सुनील तटकरे आहेतच, ते आपले दिल्लीतील प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत आणि दिल्लीतील आपली संख्या वाढत जाईल हे मी तुम्हाला ठामपणे सांगू इच्छितो.

Story img Loader