राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सातत्याने मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत. गेल्या महिन्यात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याच जाहीर केलं. त्यानंतर कार्यकर्ते, नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या विरोधानंतर शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घेतला. त्याचवेळी पक्षातील नेत्यांकडे अधिक आणि मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या जातील असं त्यांनी जाहीर केलं. त्यानुसार गेल्या आठवड्यात शरद पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षपदी नेमणूक केली. त्यानंतर आज (२१ जून) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात पक्षातील वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मला विरोधी पक्षनेते पदावरून मुक्त करा. त्याऐवजी मला पक्ष संघटनेत हवी ती जबाबदारी द्या असं अजित पवार पक्षातील सर्व वरिष्ठ नेत्यांसमोर म्हणाले. यावेळी शरद पवारही उपस्थित होते.
“…म्हणून मला विरोधी पक्षनेतेपदावरून मुक्त करा”, शरद पवारांसमोर अजित पवारांनी मांडली व्यथा; म्हणाले…
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवार यांचं मोठं वक्तव्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 21-06-2023 at 18:11 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar says release me from leader of opposition post in legislative assembly asc