अयोध्येत (उत्तर प्रदेश) नव्याने बांधल्या जात असलेल्या मंदिरात सोमवारी (२२ जानेवारी) श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. देशभर सध्या या सोहळ्याची चर्चा आहे. या दिवशी श्री रामजन्मभूमी ट्रस्टने अयोध्येत मोठ्या उत्सवाचं आयोजन केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत या तिघांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडेल. रामजन्मभूमी ट्रस्टने या उत्सवाचं अनेकांना निमंत्रण पाठवलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातील अनेक मंत्री, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, मोठे नेते, राम मंदिरासाठी आंदोलन करणारे कारसेवक, खेळाडू, कलाकार आणि साधू-संतांसह तब्बल ७,००० हून अधिक लोकांना या उत्सवाचं निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. अयोध्येत या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी चालू आहे. सोमवारी दुपारी १२.१५ ते १२.४५ दरम्यान मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे.
“आम्ही आज अयोध्येला जाणार होतो, पण…”, अजित पवारांनी सांगितलं प्राणप्रतिष्ठेला न जाण्याचं कारण
रामजन्मभूमी ट्रस्टने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना (देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार) या सोहळ्याचं निमंत्रण पाठवलं आहे.
Written by अक्षय चोरगे
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 21-01-2024 at 15:05 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar says we wont attend ram mandir consecration in ayodhya will go after 22 january asc