लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी मुसंडी मारेल. तसेच महायुतीपेक्षा महाविकास आघाडीला चार टक्के अधिक मते मिळतील, असा अंदाज एबीपी – सी व्होटर सर्व्हेने व्यक्त केला. याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. “अशा सर्व्हेंना काही अधिकार नसतो. विधानसभेच्या पाच राज्यांचे सर्व्हे आठवा आणि निकाल काय लागले ते पाहा. कुठल्या भागात सर्व्हे झाला, त्यावर अंदाज लावला जातो. कुणी कितीही सर्व्हे केले तरी महायुतीमधील तीनही पक्ष त्याची काळजी घेऊ. आमच्या हातात आणखी वेळ आहे, महायुतीच्या बाजूने वातावरण तयार करण्यासाठी आम्ही काम करू”, असे अजित पवार यांनी सांगितले.

पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी योग्यच

“महायुतीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आहेत. त्यांच्यासमोर विरोधकांकडे या पदासाठी कोण आहे? विरोधक जेव्हा पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करेल, तेव्हा जनता तुलना करेलच. माध्यमेही तुलना करतील. माध्यमाचे प्रतिनिधीही कुठले बटण दाबणार आहेत, याचे त्यांनीही आत्मपरिक्षण करावे. आतातरी देशात नरेंद्र मोदींशिवाय पंतप्रधानपदाचा योग्य उमेदवार दुसरा कोणताही नाही”, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

yogi adityanath criticize congress and mahavikas aghadi
योगी आदित्यनाथ म्हणाले “काँग्रेस नेतृत्वातील ‘मविआ’ची नियत साफ नाही”
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
accountability of devendra fadnavis declined due to his divisive politics says supriya sule
फोडाफोडीच्या राजकारणामुळे फडणवीसांची विश्वसनीयता कमी; सुप्रिया सुळे
mayura kale vs sumit wankhede arvi assembly constituency election
लक्षणीय लढत : खासदार पत्नी विरुद्ध फडणवीसांचे विश्वासू असा सामना
nitin gadkari
Nitin Gadkari: ‘भाजपाचं पिक वाढलंय, त्यावरही फवारणी करण्याची गरज’, नितीन गडकरींचा इशारा कुणाकडे?
Nitin Gadkari Umarkhed, Nitin Gadkari Kisan Wankhade,
“काँग्रेसने जातीयवाद आणि सांप्रदायिकतेच विष कालवले,” नितीन गडकरी यांची यवतमाळात टीका
Rs 700 crore was recovered from liquor sellers pm Narendra Modi alleged
“काँग्रेसच्या सत्तेतील राज्य शाही परिवाराचे ‘एटीएम’, मद्यविक्रेत्यांकडून ७०० कोटी रुपयांची वसुली,” पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घणाघात
devendra fadnavis, public rally, nagpur west assembly constituency
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही पाकिस्तानमधून उमेदवार…”

हे वाचा >> महायुती की महाविकास आघाडी? लोकसभेला लोकांची पसंती कुणाला? सर्व्हेची धक्कादायक आकडेवारी समोर

अजित पवार पुढे म्हणाले, “केंद्र सरकारने गॅस सिलिंडरच्या किंमती कमी करण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजारांची मदत केली. त्यात राज्य सरकारने सहा हजारांची भर घातली, असे अनेक निर्णय केंद्र सरकारने घेतले आहेत. देशाचे हित कुणाच्या हाती आहे, जागतिक पातळीवर देशाचे नेतृत्व करत असताना भारताची प्रतिमा उंचावण्याचे काम कोण करू शकेल? असे अनेक मुद्दे पाहावे लागतात. केवळ एका विषयाचा विचार करून चालणार नाही. आताच आपण पाच राज्यातील निवडणुकांचा अंदाज घेतला. तीन राज्यातील जनतेने भाजपाला मतदान केले.”

“तेलंगणातही काय झाले आपण पाहिले. तिथले पुर्वाश्रमीचे मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या दैनिकात जाहिराती देत होते. मी हे केले, ते केले, असे सांगत होते. पण तरिही त्यांचाच एका मतदारसंघात पराभव झाला आणि राज्यातले सरकारही गेले. सर्व्हे अंदाज व्यक्त करतात, म्हणजे मतदारही त्याचप्रकारे विचार करतात असे नाही”, हे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

‘माझं ऐकायचंच हे कार्यकर्त्यांसाठी होतं’

बारामती येथे ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचा सत्कार करत असताना आता इथून पुढे माझंच ऐका, असे अजित पवार म्हणाले होते. याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, मी माझ्या कार्यकर्त्यांना काय बोलायचे, हा माझा अधिकार आहे. मी मतदारांना किंवा माध्यमांना काही बोललो नाही. माझ्या कार्यकर्त्यांना काय सांगायचे, हा माझा अधिकार आहे. इतरांनी आक्षेप घेण्याचे काही कारण नाही, असेही ते म्हणाले.