विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक मुद्द्यांवरून खडाजंगी पाहायला मिळत आहे. आज अधिवेशनाच्या कामकाजादरम्यान अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य करताना जोरदार हल्लाबोल केला. तसेच, उद्धव ठाकरेंच्या काही विधानाचा संदर्भही यावेळी एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिला. मात्र, यावरून विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार चांगलेच संतप्त झाले. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणाला उत्तर देताना परखड शब्दांत प्रत्युत्तर दिलं.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. “ज्या प्रबोधनकारांनी कर्मकांडावर सातत्याने प्रहार केले, अंधश्रद्धेविरूद्ध लढले, त्याच प्रबोधनकारांचे वारस म्हणवणारे लिंबू-टिंबूची भाषा करू लागले. कुठे चाललोय आपण? आम्ही वर्षावर फार नंतर गेलो. तिथे पाटीभर लिंबं सापडली. त्यात सगळं होतं. खरंतर लिंबू-टिंबूची भाषा करणाऱ्यांनी बाळासाहेबांच्या विचारांसोबतच प्रबोधनकारांच्या विचारांनाही तिलांजली दिली”, असं एकनाथ शिंदे भाषणात म्हणाले.

principal suspended for negligence in duty in midday meal food poisoning case pmd
वर्धा : कर्तव्यात कसुर; मुख्याध्यापक निलंबित; शालेय पोषण आहार विषबाधा प्रकरण
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Ajit Pawar And Amol Mitkari.
Ajit Pawar : “…तर सरकारलाही अर्थ नाही”, अजित पवार आणि अर्थ खात्यावरून अमोल मिटकरींचा महायुतीलाच टोला
Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Dispute :
Eknath Shinde : “कर्नाटक सरकारचा दडपशाहीचा प्रयत्न”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुनावलं
Uday Samant On Jayant Patil
Uday Samant : “जयंत पाटील महायुतीत येणार असतील तर…”, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
suraj chavan meet dcm ajit pawar
“देवमाणूस आहेत दादा…”, अजित पवार उपमुख्यमंत्री होताच सूरज चव्हाण पोहोचला मंत्रालयात! नव्या घराबद्दल म्हणाला…
Gashmeer Mahajani
“…तरच मूल होऊ द्या”, पालकत्वाविषयी स्पष्टच बोलला गश्मीर महाजनी; म्हणाला, “तुम्ही आई-वडील म्हणून कैद…”
Eknath Shinde
Eknath Shinde : “…पण ते पुन्हा आले”, देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंनी केलं राहुल नार्वेकरांचं अभिनंदन!

“कुणावर आरोप करताय? ज्याला सगळी अंडीपिल्ली माहिती आहेत. जे घरातून बाहेरच पडत नाहीत, त्यांनी हिंमत दाखवण्याची भाषा करायची म्हणजे काय? हा मोठा विनोद आहे.आपत्ती येते, तेव्हा आम्ही लढतो. बाळासाहेब खंबीरपणे पाठिशी उभे राहायचे. तुम लढो, हम कपडा संभालते है असं नाही म्हणायचे”, असंही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

“अजितदादा, शेतकऱ्यांनी पाणी मागितलं तेव्हा तुमच्या तोंडून…”, मुख्यमंत्र्यांनी करून दिली ‘त्या’ विधानाची आठवण! म्हणाले, “आत्मक्लेश…”

“मुख्यमंत्र्यांचं भाषण कधीही…”

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या भाषणावर अजित पवारांनी जोरदार हल्लाबोल केला. “राज्याच्या कुठल्याही विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्ताव विरोधकांसाठी महत्त्वाचा असतो. त्याला मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री उत्तर देतात. सहा महिन्यांपूर्वी काय झालं हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्याला आज सहा महिने झाले. मीही सभागृहात ३२ वर्ष झाली आलोय. त्याआधीही मी इतरांची भाषणं ऐकायचो. शरद पवारांनीही ७८ साली पुलोद स्थापन केलं होतं. तेव्हा अनेक मान्यवर त्या मंत्रीमंडळात होते. पण कधीही मुख्यमंत्र्यांची भाषणं ही राजकीय होत नाहीत. एखाद-दुसरा चिमटा काढला, मी समजू शकतो”, असं अजित पवार म्हणाले.

“तुम्ही ज्यांना सोडून आलात, त्यांच्या…”

“बाहेर तुम्ही ज्यांना सोडून आलात, त्यांच्या वृत्तपत्रात काही बातम्या येणार. ते तुम्ही मनाला लावून घेणार. ते तुम्ही इथे सांगणार. आम्हाला काय देणं-घेणं आहे त्याचं. यशवंतराव चव्हाणांची शिकवण बघा. आचार्य अत्रे त्यांच्यावर किती टीका करायचे. तरी ते दिलदारपणे घ्यायचे. मुख्यमंत्री महोदय, तुम्ही त्यातून बाहेर या. तुम्हाला बहुमत मिळालंय. या राज्याचे तुम्ही मुख्यमंत्री झाले आहात. असल्या छोट्या गोष्टीत तुम्ही तुमचं मन जास्त रमवू नका. हे राज्यातल्या जनतेला अजिबात आवडणार नाही”, अशा शब्दांत अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं.

“तरुणांना वाटतंय मला काम कसं मिळणार आहे. महागाई कशी कमी होणार आहे. शेतकऱ्यांबाबत काय भूमिका घेतली जाणार आहे यात रस आहे. तुम्ही तुमच्या मुलाच्या वयाच्या लोकांनाच जास्त टार्गेट करत आहात. जाऊ द्या ना, मुलं आहेत म्हणून सोडून द्या ना. दुसऱ्या कार्यकर्त्यांना प्रवक्ते म्हणून बोलू द्या ना. तुमचे नरेंद्र मोदींशी, अमित शाहा यांच्याशी चांगले संबंध झालेत. तिथून राज्यासाठी अजून काय चांगलं आणता येईल हे बघा. राज्याच्या हितासाठी दिल्लीत जा. पण तुम्ही त्यावर बोलत नाहीयेत”, असंही अजित पवार म्हणाले.

Story img Loader