‘राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’ अशी जाहीरात शिवसेनेच्या शिंदे गटाने प्रसिद्ध केली आहे. राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडण‌वीस यांच्यापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अधिक लोकप्रिय असल्याची आकडेवारी एका सर्वेक्षणाच्या आधारे जाहीर करून शिंदे यांनी फडणवीस यांच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला असल्याचं बोललं जात आहे. या जाहिरातीवर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. अजित पवार म्हणाले, शिंदे साहेब किंवा हे जाहिरात देणारे इतक्या लवकर कसे काय बाळासाहेब ठाकरे यांना विसरले मला काय कळलं नाही. मुळातच हा पक्ष त्यांनी स्वतःकडे का घेतला? कारण आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे आहोत, आनंद दिघे यांच्या विचारांचे आहोत, असं म्हणत त्यांनी पक्ष स्वतःकडे खेचून घेतला. परंतु त्या जाहिरातीवर कुठे आनंद दिघेंचा फोटो दिसेना, कुठं बाळासाहेबांचा फोटो दिसेना.

Eknath Shinde on Raj Thackeray
Eknath Shinde: राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात काय बिनसलं? शिंदे यांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले…
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Oppositions stole promises along with schemes criticized Eknath Shinde in Ambernath
“विरोधकांनी योजनांसह वचननामाही चोरला…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अंबरनाथमध्ये टीका
Eknath Shinde allegation regarding Mahavikas Aghadi manifesto Jalgaon news
महाविकास आघाडीने जाहीरनामा चोरला; एकनाथ शिंदे यांचा आरोप
Uddhav Thackeray criticized Eknath Shinde
“माझी बॅग तुझ्याकडे देतो, फक्त त्यातले कपडे…”; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं!
Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Ajit Pawar scolded Ravi Rana
“महायुतीत मिठाचा खडा टाकू नका”, मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री अजित पवारांनी रवी राणांना खडसावले
Uddhav Thackeray News Update News
“महाराष्ट्र दरोडेखोर अन् गुंडांच्या हाती”, उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर सडकून टीका; पक्षचिन्हावरून माजी सरन्यायाधीशांनाही केलं लक्ष्य; म्हणाले…
Loksatta lokrang A review of the achievements of Maharani Baijabai Shinde
दखल: बायजाबाई यांच्या कर्तृत्वाचा आढावा

अजित पवार म्हणाले, अशा प्रकारच्या जाहिराती मी पाहिल्या आहेत. पण हा वेगळा प्रकार आहे. त्यांनी स्वतःच ठरवून सर्वेक्षण केलं आणि प्रसिद्ध केलं. कुणी सर्वेक्षण केलं, कुणी सांगितलं किती टक्के लोकांचा कौल आहे, याची कसलीच माहिती देण्यात आली नाही. साधारणपणे एक्झिट पोल येतात, परंतु ते कोणी केलेत ते सांगितलं जातं. तसा हा सर्व्हे कोणी केला आहे, याची माहिती दिली जाते. परंतु अशा प्रकाची सर्वेक्षणाची जाहिरात करण्याचा विश्वविक्रमच आपल्या राज्य प्रमुखांनी केला आहे.

हे ही वाचा >> शिंदे यांच्याकडून फडणवीसांवर कुरघोडी ; भाजपमध्ये अस्वस्थता

अजित पवार म्हणाले, मुळात जाहिरात कशासाठी केली जाते, जेणेकरून आपण केलेली कामं लोकांपर्यंत पोहोचावी. पण यांनी केवळ स्वतःची प्रसिद्धी केली आहे. शिवसेना आमचीच असा दावा करणाऱ्यांनी जाहिरातीत मोदी साहेबांचा फोटो टाकला आहे. स्वतःचाही फोटो टाकला, पण बाळासाहेबांचा फोटो सोईस्कररित्या वगळला आहे. राज्याचा विकास आणि लोकांचे प्रश्न पद्धतशीरपणे यांनी बाजूला ठेवले आहेत.