Ajit Pawar on Sanjay Gaikwad Statement about Rahul Gandhi: शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींबाबत केलेल्या विधानामुळे खळबळ उडाली आहे. विशेषत: राज्यातल्या सत्ताधारी पक्षाकडूनच, त्यातही मुख्यमंत्र्यांच्या पक्षातील आमदारांनी अशा प्रकारचं विधान केल्यामुळे त्यावरून उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळात पूजा करण्यात आली. यानंतर माध्यमांशी बोलताना पत्रकारांनी त्यांना संजय गायकवाड यांच्या विधानाबाबत विचारणा केली असता अजित पवारांनी त्यांना कानपिचक्या दिल्या.

संजय गायकवाड यांचं कोणतं विधान चर्चेत?

शिंदे गटाचे बुलढाण्यातील आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधींच्या आरक्षणाबाबतच्या विधानावर टीका करताना गंभीर टिप्पणी केली. ‘भारतात जेव्हा न्याय्य परिस्थिती निर्माण होईल, तेव्हा आरक्षण हटवण्याबाबत विचार करू’, अशा आशयाचं विधान राहुल गांधींनी अमेरिकेतील एका चर्चासत्रात केलं होतं. त्यावरून टीका होत असताना संजय गायकवाडांनी थेट राहुल गांधींची जीभ छाटण्यासंदर्भात विधान केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule : “महाविकास आघाडी आणि काँग्रेस आमदार, खासदारांंमध्ये अस्वस्थता; अनेकजण…”; चंद्रशेखर बावनकुळेंचं महत्त्वाचं वक्तव्य
Rahul Gandhi Protest against modi shah
मोदी-अदाणीविरोधात काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींच्या अनोख्य आंदोलनाने वेधले लक्ष
Sharad Pawar News
Uday Samant : “शरद पवारांचं इंडिया आघाडीबाबतचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे काँग्रेसचा अपमान, राहुल गांधीचं नेतृत्व..” उदय सामंत काय म्हणाले?
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
What Devendra Fadnavis Said About Rahul Narwekar ?
Devendra Fadnavis : “राहुल नार्वेकर पुन्हा येईन म्हणाले नव्हते तरीही पुन्हा आले..”, देवेंद्र फडणवीस यांचं खुमासदार भाषण

“राहुल गांधी यांच्या कथित आरक्षणविरोधी विधानामुळे काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला आहे. त्यांना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय यांचे आरक्षण संपवायचे आहे. राज्यात आणि भारत देशात आरक्षणावरून आग भडकवली असताना राहुल गांधी यांनी विदेशात जाऊन हे विधान करून आपली आरक्षणविरोधी भूमिका मांडली आहे”, असं ते म्हणाले. तसेच, “राहुल गांधी यांनी विदेशी भूमीवर आरक्षण विरोधी भूमिका मांडली आहे. या राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला मी अकरा लाख रुपयांचे रोख बक्षीस देईन”, अशी घोषणाच त्यांनी केली.

बुलढाणा : राहुल गांधींची जीभ कापणाऱ्यास ११ लाखांचे बक्षीस; संजय गायकवाड यांची प्रक्षोभक घोषणा

दरम्यान, नंतरही विचारणा केल्यावर आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचीच भूमिका संजय गायकवाड यांनी घेतल्यानंतर आता यावरून सत्ताधारी शिंदे गट अडचणीत येण्याची शक्यता आहे. यासंदर्भात आज अजित पवारांना विचारणा केली असता त्यांनी अप्रत्यक्ष शब्दांमध्ये संजय गायकवाड यांना कानपिचक्या दिल्या.

काय म्हणाले अजित पवार?

अजित पवार यांनी यावेळी बोलताना सामाजिक सलोखा बिघडणार नाही, असं वर्तन ठेवण्याचं आवाहन केलं. “आज आपण गणरायाला निरोप देत आहोत. आजच्या दिवशी राजकीय चर्चा नको. पण मी नेहमीच सांगतो की माझ्यासहित कुणीच वेडीवाकडी विधानं करू नये. जी सुसंस्कृत महाराष्ट्राची परंपरा आहे, यशवंतराव चव्हाणांनी जी शिकवण आपल्याला दिली आहे, त्यातून सगळ्यांनीच पुढे जावं. जाती-जातींत, समाजा-समाजांत अंतर पडेल अशी विधानं करू नये. अशा विधानांमुळे राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप, वाद होतात. त्यातून वातावरण गढूळ होतं. नवे प्रश्न निर्माण होतात. ते प्रश्न निर्माण करण्याचा कुणीही प्रयत्न करू नये. जे चुकीचं वागतील, त्यांना माझा विरोध आहेच. मी त्यावर माझा निषेध व्यक्त करतो”, असं अजित पवारांनी यावेळी नमूद केलं.

राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येणार का?

दरम्यान, यावेळी अजित पवारांना राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येणार का? असा प्रश्न विचारला असता त्यावर ठामपणे ‘हो’ असं उत्तर न देता अजित पवारांनी मतदारांच्या मनात जे असेल, ते होईल, अशा आशयाचं विधान केलं. “माझं स्पष्ट मत आहे. शेवटी आमच्या मतदार राजाच्या मनात जे येईल, त्या पद्धतीचं सरकार येत असतं. आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करतोय, विरोधक त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत. आम्ही चांगल्या योजना दिल्या आहेत, विकासाचा कार्यक्रम दिलाय. केंद्रात मोदींच्या नेतृत्वात तिसऱ्यांदा सरकार आलंय. त्यांच्याकडून राज्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणण्याचं काम आपण करतोय”, असं अजित पवार म्हणाले.

Story img Loader