राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे. आज त्याचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटताना पाहायला मिळाले. एका दिवशी एकीकडे अजित पवार गट तर दुसरीकडे शरद पवार गट या दोघांची एकाच वेळी बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत बोलताना अजित पवारांनी त्यांची सविस्तर भूमिका स्पष्ट केली. अजित पवारांनी थेट शरद पवारांना लक्ष्य करताना त्यांच्या विविध भूमिकांवर तीव्र आक्षेप नोंदवला. यावेळी अप्रत्यक्षपणे अजित पवारांनी शरद पवारांवर निवृत्तीसंदर्भातही टीका केली.

२०१४ला बाहेरून पाठिंबा दिला – अजित पवार

यावेळी अजित पवारांनी २०१४मध्ये घडलेल्या घडामोडींचा उल्लेख केला. “२०१४मध्ये प्रफुल्लभाईंचं शरद पवारांशी बोलणं झालं. नंतर प्रफुल्लभाईनी जाहीर केलं की आम्ही बाहेरून भाजपाला पाठिंबा देतो. आम्ही गप्प बसलो. का? तर नेत्यांनी निर्णय. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. आम्हाला सांगितलं की सगळ्यांनी वानखेडेला शपथविधीला जा. नरेंद्र मोदी मला ओळखतात. ते आमच्याशी बोलले. तेव्हा त्यांच्याबरोबर जायचं नव्हतं तर आम्हाला तिथे का पाठवलं? मंत्रिमंडळाच्या शपथविधीला का पाठवलं?” असा सवाल अजित पवारांनी शरद पवारांच्या निर्णयावर उपस्थित केला.

Vijay Wadettiwar and Sanjay Gaikwad
गायकवाड यांना वडेट्टीवार यांचे प्रत्युत्तर ,म्हणाले ‘पन्नास खोके घेणाऱ्यांना सत्तेची मस्ती’
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Sanjay Rathod in Digras Assembly Constituency Vidhan Sabha Nivadnuk 2024
कारण राजकारण: दिग्रसमध्ये राठोड यांचा प्रचार भाजप करणार? ‘मविआ’कडून कोणाला उमदेवारी?
Sanjay Raut
Sanjay Raut : “संकेत बावनकुळेंच्या गाडीमध्ये दारूसह बीफ कटलेटची बिले आढळली”, संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले, “भाजपाने हिंदुत्व..”
Rajendra Raut, Manoj Jarange patil ,
मनोज जरांगे यांच्या आंदोलनातून आघाडीला सत्तेत आणण्याचा डाव, आमदार राजेंद्र राऊत यांचा पुन्हा हल्ला
aditya thackeray
Aditya Thackeray : “मुख्यमंत्री पदासाठी शरद पवारांच्या डोक्यात उद्धव ठाकरेंचा चेहरा नाही”, म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना आदित्य ठाकरेंचा टोला; म्हणाले…
NCP ajit pawar group,Dharmarao Baba Atram eldest daughter join sharad pawar group
राष्ट्रवादीच्या जेष्ठ मंत्र्याच्या घरातच फूट, मुलगी लवकरच शरद पवार गटात…सोबत जावयानेही….
Sudhir Mungantiwar criticizes opposition parties
“…तरी विरोधक देवेंद्र फडणवीस यांचेच नाव घेतील”, सुधीर मुनगंटीवार यांची टीका

२०१७ ला काय घडलं होतं?

अजित पवारांनी २०१७ला घडलेल्या घडामोडी, बैठकांविषयीही गौप्यस्फोट केला. “२०१७ ला वर्षा बंगल्यावर चर्चा झाली. मी, सुनील तटकरे, जयंत पाटील आणि अजून एक असे चार जण होतो. समोर सुधीर मुनगंटीवार, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, चंद्रकांत पाटील हे चौघं होते. कुठली खाती, कुठले पालकमंत्रीपदं हे सगळं ठरलं होतं. मी खोटं बोलत नाही. खोटं बोललो तर पवाराची औलाद सांगणार नाही. आम्हाला निरोप आला. सुनील तटकरेंना दिल्लीला बोलवलं. त्यांच्या वरिष्ठांनी सांगितलं २५ वर्षांचा आमचा मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेनेला आम्ही सोडणार नाही. ते म्हणाले शिवसेनाही आघाडीत राहील. आपल्या वरिष्ठांना ते मान्य नव्हतं. ते म्हणाले ‘शिवसेना आम्हाला चालणार नाही. शिवसेना जातीवादी आहे”, अशा शब्दांत अजित पवारांनी त्यावेळच्या घटना सांगितल्या.

“वय आता ८२ झालं, ८३ झालं तरीही…” अजित पवारांनी थेट शरद पवारांच्या निवृत्तीचाच मुद्दा केला उपस्थित

२०१९चा ‘तो’ शपथविधी आणि राजकीय घडामोडी

दरम्यान, यावेळी २०१९ साली घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीआधी घडलेल्या घडामोडींवरही अजित पवारांनी यावेळी भाष्य केलं. “२०१९ला निकाल लागले, मोठ्या उद्योगपतीच्या घरी आपले वरिष्ठ नेते, प्रफुल्ल पटेल, ते उद्योगपती, भाजपाचे वरिष्ठ नेते, मी, देवेंद्र फडणवीस सगळी चर्चा झाली. पाच बैठका झाल्या. मला आणि देवेंद्रला आपल्या नेत्यांनी सांगितलं की कुठे बोलायचं नाही. मग मी का बोलेन कुठे? नंतर अचानक बदल झाला आणि सांगितलं की आपण शिवसेनेबरोबर जायचंय. मला सांगा, २०१७ला शिवसेना जातीवादी असल्याचं सांगत त्यांच्याबरोबर जायचं नाही असं म्हटलं. मग असा काय चमत्कार झाला की दोन वर्षांनी शिवसेना मित्रपक्ष झाला? ज्या भाजपाबरोबर जायच होतं तो जातीवादी कसा झाला?” असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला.