Delhi Ajit Pawar Sharad Pawar Meet: राजधानी दिल्लीत सध्या राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी व विरोधकांमधील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारण तापलं आहे. तर दुसरीकडे शरद पवारांच्या निवासस्थानी गुरुवारी सकाळी घडलेल्या घडामोडींमुळे महाराष्ट्रात तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. शरद पवारांच्या ८५व्या वाढदिवसानिमित्त दिल्लीत अजित पवार यांनी सहकुटुंब त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यासंदर्भात भेटीनंतर माध्यमांशी बोलताना अजित पवारांनी शरद पवारांशी नेमकी काय चर्चा झाली? यावर भाष्य केलं.

शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी आपण आलो असल्याचं अजित पवारांनी यावेळी सांगितलं. भेटीवेळी त्यांच्यासमवेत पत्नी व खासदार सुनेत्रा पवार, मुलगा पार्थ पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार छगन भुजबळ आदी प्रमुख नेतेमंडळीही उपस्थित होती. त्यामुळे या भेटीमध्ये नेमकी काय राजकीय चर्चा झाली? याविषयी मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

jitendra awhad sharad pawar (1)
शरद पवारांकडून RSS चं कौतुक, भाजपाशी जवळीक वाढल्याची चर्चा; आव्हाड म्हणाले, “आम्ही संघाच्या विचारसरणीचं…”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Devendra Fadnavis and Sharad Pawar (1)
Sharad Pawar : बीडप्रकरणी शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन; म्हणाले, “राजकारणात मतभेद असतील-नसतील, पण…”
ajit pawar sharad pawar (7)
Sharad Pawar NCP: सुप्रिया सुळे वगळता शरद पवार गटाच्या ७ खासदारांना होती अजित पवार गटाकडून ‘ऑफर’, पडद्यामागे घडतंय काय?
Sujay Vikhe Patil On Shirdi Sai Sansthan
Sujay Vikhe : ‘महाराष्ट्रातील भिकारी येथे गोळा झालेत, शिर्डीतील मोफत जेवण बंद करा’, सुजय विखेंचं विधान चर्चेत
Sharad pawar and Ajit Pawar
Supriya Sule : शरद पवार – अजित पवार एकत्र येण्याच्या चर्चेवर सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, “माझ्या कुटुंबाबाबत…”
शरद पवार आणि अजित पवार एकत्र यावेत असं राष्ट्रवादीच्या नेत्यांना का वाटतंय? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : शरद पवार आणि अजित पवार एकत्र यावेत असं राष्ट्रवादीच्या नेत्यांना का वाटतंय?
Sharad Pawar Ajit Pawar
BJP : शरद पवार-अजित पवार एकत्र येण्याबद्दल बावनकुळेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “भाजपाची ना…”

काय म्हणाले अजित पवार?

“आज शरद पवारांचा वाढदिवस आहे. उद्या काकींचा वाढदिवस आहे. त्याअनुषंगाने त्यांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही इथे आलो होतो. साधारण सध्या काय घडामोडी चालू आहेत, परभणीला काय घडलं अशा सगळ्या चर्चा झाल्या. लोकसभा व राज्यसभेत काय चाललंय, मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार आहे, महाराष्ट्रात हिवाळी अधिवेशन कधी आहे अशा मुद्द्यांवर चर्चा झाली”, असं अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar Sharad Pawar Meet: दिल्लीत अजित पवार-शरद पवार भेट; युगेंद्र पवार म्हणतात, “एकत्र येण्यासाठी प्रयत्न…”

दरम्यान, यावेळी अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये निवडणूक काळात झालेल्या टीका-टिप्पणीनंतरही ही कौटुंबिक भेट कशी झाली? अशी विचारणा केली असता त्यावर अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली. “राजकारणात टीका-टिप्पणीव्यतिरिक्तही संबंध असतात ना. महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाणांनी सुसंस्कृत राजकारण कसं करायचं ते शिकवलंय. त्याप्रमाणे आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतोय”, असं ते म्हणाले.

महाराष्ट्रात १४ तारखेला शपथविधी?

दरम्यान, सध्या सगळीकडे चर्चा पाहायला मिळत असलेल्या मंत्र्यांच्या शपथविधीवर अजित पवारांनी यावेळी मोठं विधान केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शपथविधीनंतर इतर मंत्र्‍यांचे शपथविधी कधी होणार? अशी विचारणा केली असता त्यावर अजित पवारांनी “बहुतेक १४ डिसेंबरला इतर मंत्र्यांचे शपथविधी होतील”, असं विधान केलं. त्यामुळे आता मंत्रीमंडळातील संभाव्य नावांची चर्चा सुरू झाली आहे.

Story img Loader