राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी अलीकडेच शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. अजित पवारांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आहे. पक्षफुटीनंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट आमने-सामने आले आहेत. दोन्ही गटांकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. दरम्यान, अजित पवार यांनी पुन्हा एकदा शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका केली आहे.

तसेच शरद पवारांनी २०१४ साली भाजपाला दिलेल्या पाठिंब्याचा पुनरुच्चारही अजित पवारांनी केला. ते सोलापूर येथे एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा का दिला? यावरही भाष्य केलं.

NCP Sharad Pawar faction state president MLA Jayant Patil has no statement regarding party defection
राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांच्या मौनाचा अर्थ काय?
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Image Of Ajit Pawa
“महायुतीच्या बातम्या नीट द्या नाहीतर…”, हातात AK47 घेत अजित पवारांची मिश्किल टिप्पणी
controversial referee decision at maharashtra kesari event
अन्वयार्थ : कुस्तीच चितपट होऊ नये यासाठी…!
Chandrakant patil loskatta news
चावडी : चंद्रकांतदादांची ‘साखरझोप’
mahant namdevshastri latest news in marathi
“नामदेव शास्त्रींनी माफी मागावी अन्यथा…”, राष्ट्रवादी शरद पवार गटाचा इशारा
Yogesh Kadam On Sanjay Shirsat :
Yogesh Kadam : शिवसेनेच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली? “संजय शिरसाट काय म्हणतात त्याला महायुतीत महत्त्व नाही”, योगेश कदमांचं विधान
Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”

हेही वाचा- “माझे काका मला चांगल्याप्रकारे ओळखत असावेत, म्हणून…”, अजित पवारांबद्दल रोहित पवारांचं सूचक विधान

शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देण्याच्या निर्णयावर भाष्य करताना अजित पवार म्हणाले, “राज्यातील वेगवेगळे प्रश्न सोडवण्यासाठी, आपली कामं होण्यासाठी, बहुजन समाज, वंचित, गरीब, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक वर्गाचं भलं होण्यासाठी आपण ही भूमिका घेतली आहे. आज ४५-५० आमदार अशी भूमिका घेतात, हे साधी गोष्ट नाही. आम्हीही ३०-३५ वर्षे समाजकार्य-राजकारण केलं आहे. आम्हीही वरिष्ठांचा मान राखला आहे. वरिष्ठांचा आदर केला आहे. वरिष्ठांनी जे सांगितलं त्याची अंमलबजावणी केली आहे, हे सगळ्यांना माहीत आहे.”

हेही वाचा- “तेव्हा मी-मी म्हणणाऱ्यांचा…”, निवडणूक जिंकण्याबाबत अजित पवारांचं विधान चर्चेत

शरद पवारांचा अप्रत्यक्ष उल्लेख करत अजित पवार पुढे म्हणाले, “२०१४ साली आमच्या वरिष्ठांनी (शरद पवार) भाजपाला बाहेरून पाठिंबा दिला. तेव्हा आम्ही गप्प बसलो. त्यांनी घेतलेला निर्णय आम्ही मान्य केला. अशा अनेकदा घटना घडल्या आहेत. त्याचा मी स्वत: साक्षीदार आहे. त्यातूनच आम्ही ही भूमिका स्वीकारली.”

Story img Loader