राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार ३० ते ४० आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. आज सकाळी देवगीरी बंगल्यावर अजित पवारांनी समर्थक आमदारांची बैठक घेतली. त्यानंतर संबंधित आमदारांच्या सहीचं पत्र घेऊन अजित पवार राजभवनावर दाखल झाले. यानंतर काही वेळातच अजित पवारांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेतेही मंत्रीपदाची शपथ घेणार आहे.

मंत्रीमंडळात सामील झालेल्या नेत्यांची यादी

अजित पवार -उपमुख्यमंत्री
छगन भुजबळ – मंत्री
दिलीप वळसे-पाटील-मंत्री
हसन मुश्रीफ- मंत्री
धनंजय मुंडे- मंत्री
धर्मारावबाबा आत्राम-मंत्री
आदिती तटकरे- मंत्री
संजय बनसोडे – मंत्री
अनिल पाटील – मंत्री

Uddhav Thackeray speech
“…अन् प्रियांका गांधींनी भाजपाचे दात घशात घातले”, पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ आव्हानाला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Eknath Shinde, Sangola, Shahajibapu Patil,
शहाजीबापू पाटील आमच्या टीमचे ‘धोनी’! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले कौतुक
maharashtra assembly election 2024 ncp participation in power was certain with shinde rebellion ajit pawar
शिंदे यांच्या बंडाच्या वेळीच राष्ट्रवादीचाही सत्तेत सहभाग निश्चित; अजित पवार यांचा गौप्यस्फोट
Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Ajit Pawar scolded Ravi Rana
“महायुतीत मिठाचा खडा टाकू नका”, मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री अजित पवारांनी रवी राणांना खडसावले
Hadapsar, NCP, Hadapsar latest news,
हडपसरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वर्चस्वासाठीची लढाई
Rajshree Ahirrao, Devalali, Mahayuti Devalali,
नाशिक : देवळालीत महायुतीतील मतभेद मिटता मिटेना, अजित पवार गटाविरोधात शिंदे गटाचा प्रचार

खरं तर, अलीकडेच अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी उत्सुक असल्याचं बोललं जात होतं. त्यासाठी अजित पवार आपल्या समर्थक आमदारांच्या वतीने पक्षावर दबाब टाकत होते, अशीही चर्चा सुरू होती. यानंतर आता अजित पवार राजभवनावर दाखल झाले. अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या इतरही नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. आता देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दोघंही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून काम करतील.