पुणे शहरातील घनकचरा आणि प्रदूषित पाण्याच्या प्रश्नावर अधिवेशन संपताच सर्वपक्षीय आमदारांची बैठक घेऊन या दोन्ही प्रश्नांचा सोक्षमोक्ष लावला जाईल, त्यासाठी नगरविकास विभागास निर्णय घेण्यास भाग पाडले जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.
फुरंसुगी विभागातील दुषित पाणी आणि घनकचरा प्रकल्पाबाबत विजय शिवथरे, विनायक निम्हण आदींनी विचारलेल्या प्रश्नावरील चर्चेदरम्यान पवार यांनी केवळ पुणेच नव्हे तर सर्वच मोठय़ा शहरांमध्ये सध्या घनकाचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न गंभीर बनला असल्याचे सांगितले.
पुण्यातील घनकचऱ्यांच्या विल्हेवाटीसाठी महापालिकेने केलेल्या उपाययोजना पुरेशा नाहीत. त्यामुळे अधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याची गरज आहे.
कचरा डेपोंसाठी महापालिकेने आजूबाजूच्या परिसरातील काही जागा संपादित करण्याचा प्रयत्न केला मात्र तेथील ग्रामस्थांनी या प्रकल्पांना विरोध केला आहे. तसेच कचरा डेपोमुळे पाण्याचे स्त्रोत प्रदूषित होत असून त्यावर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय आमदरांची बैठक घेऊन या दोन्ही प्रश्नावर तोडगा काढू असेही पवार यांनी स्पष्ट केले.
तत्पूर्वी फुरसुंगी येथील हंजर कचरा प्रक्रिया प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालत नसल्यामुळे तेथे मोठय़ा प्रमाणात कचरा शिल्लक राहत असून आता आणखी ७०० टन कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारण्याचे काम सुरू असून ते मे २०१५ पर्यंत पूर्ण होईल अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांनी दिली. तर महापालिकेच्या कचरा डेपोमुळे फुरसुंगी परिसरातील नैसर्गिक जलस्त्रोत दूषित झाले असून तेथील लोकांना टॅकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असल्याची माहिती पाणी पुरवठामंत्री दिलीप सोपल यांनी दिली.
मात्र या भागाला महापालिकेने स्वखर्चाने जलवाहिनीच्या माध्यमातून पाणी पुरवठा करावा, असा निर्देश विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी दिला.
पुण्याच्या कचरा प्रश्नी अजित पवार यांचा पुढाकार
पुणे शहरातील घनकचरा आणि प्रदूषित पाण्याच्या प्रश्नावर अधिवेशन संपताच सर्वपक्षीय आमदारांची बैठक घेऊन या दोन्ही प्रश्नांचा सोक्षमोक्ष लावला जाईल,
First published on: 11-12-2013 at 02:37 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar taking initiative to solve garbage problem of pune