मला राजकारणातील कोणीही काहीही शिकवलं नाही. भाषण कसे करायचे, तेही कोणी सांगितलं नाही. राजकारणात यशस्वी व्हायचं, तर वेगवेगळे वक्ते काय विचार मांडतात? त्यांची विचार मांडण्याची पद्धत काय? कोणतं विधान केल्यावर लोकांना आपलसं कराल? सभा कशी जिंकाल? अशा गोष्टी आम्ही पाहत गेलो. त्यातून आम्ही शिकलो, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमोरे यांनी अजित पवार यांची मुलाखत घेतली आहे. तेव्हा, राजकारण, कुटुंब, बालपण यावर अजित पवार यांनी मनमोकळेपणाने भाष्य केलं आहे. यावेळी सुनेत्रा पवार यांच्याशी लग्न कसं ठरलं? लग्नाचा निर्णय कोणाचा होता? यावरही अजित पवार यांनी भाष्य केलं आहे.

हेही वाचा : “…इथपर्यंत फालतूपणा केलाय”, अजित पवारांचा शाळेतला किस्सा ऐकून पोट धरून हसाल

अजित पवार म्हणाले की, “आमचं लव्हमॅरेज नाही. शरद पवार आणि पद्मसिंह पाटील यांचे संबंध होते. मला काही मुलींची स्थळे आली होती. तर, काही पाहिली होती. नंतर सुनेत्रा यांचं स्थळ आलं. मग, पाहण्याचा कार्यक्रम झाला. पद्मसिंह पाटील यांच्या बंधुंच्या घरी तो कार्यक्रम पार पडला. यासाठी प्रतिभा काकींनी पुढाकार घेतला होता. चर्चा झाली आणि लग्न ठरलं.”

हेही वाचा : शरद पवारांनी राजकारणातील कोणत्या गोष्टी शिकवल्या? अजित पवार म्हणाले, “मला…”

“पद्मसिंह पाटील यांचं आणि आमचं घर राजकारणात होते. त्यामुळे दोन्ही घरांमध्ये एकासारखं वातावरण असल्याने मुलगी देण्यास अडचण आली नाही. राजकारण्यांची मुलगी राजकारण नसलेल्यांच्या घरी आली, तर जुळण्यास वेळ लागतो,” असेही अजित पवार यांनी सांगितलं.