Ajit Pawar on Baramati Assembly Election: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातले दोन महत्त्वाचे पक्ष फुटीमुळे सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही गटांमध्ये दिसत आहेत. शिवसेना (एकनाथ शिंदे) सत्ताधारी तर शिवसेना (उद्धव ठाकरे) विरोधी गटात आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) सत्ताधारी तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष विरोधी गटात आहे. त्यामुळे कधीकाळी एकत्र नांदलेल्या या पक्षातील नेतेमंडळींमध्ये सध्या आरोप-प्रत्यारोपांचा जोरदार कलगीतुरा रंगल्याचं दिसत आहे. त्यातही शरद पवार विरुद्ध अजित पवार या काका-पुतण्यातील वादाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. नुकतीच शरद पवारांनी बारामतीत बोलताना केलेल्या टीकेवर आता अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
काय म्हणाले होते शरद पवार?
बारामती विधानसभा मतदारसंघ हा शरद पवार व अजित पवार या दोघांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. लोकसभेला बारामतीतून सुप्रिया सुळेंना मोठं मताधिक्य मिळालं. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. आता विधानसभेला अजित पवारांच्या विरोधात शरद पवारांनी युगेंद्र पवारांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे यानिमित्ताने पुन्हा एकदा बारामतीत काका-पुतण्या वादाचा नवा अध्याय पाहायला मिळण्याची शक्यता आहे. युगेंद्र पवारांसाठी घेतलेल्या प्रचारसभेतच शरद पवारांनी केलेल्या विधानावर अजित पवारांनी त्यांची भूमिका मांडली आहे.
“लोकसभेत एकदा तुमच्या मतांवर निवडून गेलो आणि नंतर ठरवलं की आता लोकसभा नाही. कारण ३०-३५ वर्षं सतत निवडून गेल्यानंतर नवी पिढी तयार करायला पाहिजे. त्यामुळे ३० वर्षांपूर्वी मी निर्णय घेतला की आता मी लोकसभेला उभा राहणार नाही. इथलं राजकारण मी बघणार नाही. ही सगळी जबाबदारी अजित पवारांकडे देईन. जवळपास गेली २५-३० वर्षं ही जबाबदारी त्यांच्यावर आहे. पहिली ३० वर्षं माझ्यावर, माझ्यानंतर ३० वर्षं अजित पवारांवर. आता पुढच्या ३० वर्षांची व्यवस्था करण्याची गरज आहे”, असं विधान शरद पवारांनी या भाषणात केलं होतं.
अजित पवारांनी मांडली भूमिका
बारामतीत नव्या नेतृत्वाला संधी देण्याचं आवाहन शरद पवारांनी केल्यानंतर त्यावर अजित पवारांनी वर्षांचं गणित मांडून प्रतिक्रिया दिली आहे. टीव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. “शरद पवार राष्ट्रीय नेते आहेत. त्यांनी काय विधान करावं हा त्यांचा अधिकार आहे. त्यांनी त्यांच्या पद्धतीने विधान केलं. त्याचा अर्थ प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने लावेल. त्यांनी त्यांची भूमिका मांडली. मी माझी भूमिका मांडतो”, असं अजित पवार म्हणाले.
“शरद पवारांनी बारामतीमध्ये ३० वर्षं काम केलं, त्यानंतर मला संधी मिळाली असं ते म्हणाले. आता त्यांना बदल हवाय असं तुम्ही म्हणताय. पण शरद पवारांनी ३० वर्षं बारामती विधानसभेत राहिल्यानंतर ते लोकसभेत गेले. मी बारामतीतून विधानसभेत गेलो. पण मी विधानसभेत ३० वर्षं असतानाही शरद पवार संसदेत ३० वर्षं काम करता करता बारामतीतही त्या काळात काम करत होते. त्यामुळे त्यांनी खरंतर ६० वर्षं काम केलं आहे. मग त्या हिशेबाने आत्ता माझी ३० वर्षंच झाली आहेत. मला दुसरीकडे कुठेतरी काम करावंच लागेल”, असं अजित पवार म्हणाले.
Video: शरद पवारांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत, आता राज्यसभेतही जाणार नाही? भाषणात म्हणाले…
“लोकसभेतली जागा सध्या मोकळी नाहीये. तिथे निवडणुका होऊन गेल्या आहेत. मला तर काम करायचंय. त्यामुळे त्यांनी विधानसभेपुरतं सांगितलं. आता ते सांगतायत तिसऱ्याला संधी द्या. पण तसं म्हणत असताना मी आता काय करायचंय हे त्यांनी सांगावं. ते ३० वर्षं बारामतीमध्ये काम केल्यानंतर निवृत्त झाले का? नाही. त्यांनी ६० वर्षं काम केलं. २५व्या वर्षी कामाला त्यांनी सुरुवात केल्यानंतर आता ते ८५ वर्षांचे आहेत. मग आता मी काय करायचंय?” असा प्रश्न अजित पवारांनी शरद पवारांना विचारला आहे.
“बारामतीकरांची इच्छा आहे मी पुन्हा त्यांचं प्रतिनिधित्व करावं. म्हणून मी बारामतीकरांसमोर उभा आहे. सर्वांची मतं बारामतीकर ऐकतील. ते स्वत:च्या मतांनी विधानसभेचा त्यांचा प्रतिनिधी ठरवतील”, असंही ते म्हणाले.
पुढच्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार उभे राहणार?
दरम्यान, स्वत: लोकसभेवर जाण्याबाबतही अजित पवारांनी यावेळी विधान केलं. “शरद पवार संसदेत गेल्यानंतर तिथे त्यांना काम करता आलं. मला आता संसदेत जाणं शक्य नाही. त्यामुळे सध्या तरी मला विधानसभेत जाणं भाग आहे. पुढच्या पाच वर्षांनंतर लोकसभा निवडणूक येईल तेव्हा बघू काय करायचं”, असं सूचक विधान त्यांनी केलं.