महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या चार जागांसाठी (पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ) दोन दिवसांपूर्वी मतदान पार पडलं. दरम्यान, विधान परिषदेतील चार सदस्यांच्या निरोपाच्या कार्यक्रमावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी भाजपा आमदार सुरेश धस यांच्याबद्दलचा एक गंमतीदार किस्सा सांगितला आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. अजित पवार म्हणाले, “मी सुरेश धस यांना इतरांपेक्षा जास्त ओळखतो, ही गोष्ट ते देखील मान्य करतील. एकदा मी देवगिरी बंगल्यावर असताना (संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारमध्ये अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री होते आणि सुरेश धस राज्यमंत्री होते तेव्हा…) सुरेश धस माझ्याकडे आले आणि त्यांनी थेट त्यांच्या दुसऱ्या लग्नाचा विषय काढला होता.”

अजित पवार म्हणाले, “मी देवगिरी बंगल्यावर असताना सुरेश धस त्यांच्या आईला आणि इतर काही लोकांना घेऊन माझ्याकडे आले आणि त्यांनी मला एक परवानगी मागितली. मी विचारलं, मला कसली परवानगी मागताय? तर ते म्हणाले, आईलाही बरोबर घेऊन आलोय. त्यानंतर त्यांनी कसली परवानगी मागितली असेल…? त्यांनी थेट दुसरं लग्न करण्याची परवानगी मागितली. मी ते ऐकून कपाळावर हात मारला. त्यांनी त्यांच्या आईला बाजूलाच बसवलंय आणि म्हणतात… आईची पण सहमती आहे, आता तुम्ही परवानगी द्या. त्यावर, मी त्यांना म्हटलं, अहो सुरेशराव काय चाललंय काय?” हा किस्सा सांगून अजित पवार म्हणाले, “कधी कोणाच्या मनात काय येईल हे सांगता येत नाही,”

Code of conduct violation case against MLA Geeta Jain brother sunil jain
Geeta Jain: “भाजपाकडून भ्रष्टाचारी उमेदवाराला तिकीट, मी गुवाहाटाली जाऊनही…”, गीता जैन यांची टीका
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार पडला विवाहसोहळा, फोटो आले समोर
raosaheb danve compared himself as shivaji maharaj
“मी शिवाजी तर, अब्दुल सत्तार औरंगजेब”; रावसाहेब दानवेंचं विधान!
Congress Withdrawals in Kolhapur North Assembly Election Constituency
Kolhapur Assembly Election 2024 : कोल्हापूरमधील काँग्रेसच्या माघारनाट्याने निकालाची समीकरणे बदलणार ?
uddhav thackeray sada sarvankar
Sada Sarvankar : “आपलं अंगण सोडून दुसऱ्याच्या…”, सदा सरवणकरांच्या ‘त्या’ पोस्टवरून ठाकरेंच्या शिवसेनेचा चिमटा
Ashok Pawar and Rushiraj Pawar
Ashok Pawar : आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण करून मारहाण केल्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ
Maharashtra assembly elections 2024
इडीने छळले. सत्तेशी जुळले, धन फळफळले

हे ही वाचा >> “भाजपाचा डीएनए ओबीसी असेल तर…”; लक्ष्मण हाकेंचं देवेंद्र फडणवीसांना आव्हान; म्हणाले, “गावगाड्यातील सर्व ओबीसींनी…”

सुरेश धस हे भाजपाचे विधान परिषद सदस्य आहेत. ११ जून २०१८ रोजी झालेल्या निवडणुकुती त्यांनी अशोक जगदाळेंविरुद्ध ७४ मतांनी विजय मिळवला होता. त्यांनी भाजपा, राष्ट्रवादी, परत भाजपा असा प्रवास केला आहे. सरपंचपदापासून मंत्रिपदापर्यंत मजल मारली आहे. आष्टी विधानसभा मतदारसंघातून ते तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. सध्या भाजपचे प्रवक्ते म्हणून काम पाहतात.

Story img Loader