काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना ‘पक्षप्रमुख’ असा उल्लेख टाळल्याने अनेक राजकीय चर्चांना उधाण आले होते. त्यासंदर्भात आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना शिंदे आणि फडणवीसांना टोला लगावला आहे. ‘पक्षप्रमुख’ उल्लेख टाळणे हा कद्रुपणा असल्याचे संजय राऊत म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“हा कद्रुपणा आहे”

‘पक्षप्रमुख’ असा उल्लेख टाळणे हा दोघांचाही कद्रुपणा आहे. उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे सर्वोच्च नेते आहेत. मात्र, त्यांच्या मनामध्ये उद्धव ठाकरे यांच्याविषयी द्वेष आहे. मात्र, हा द्वेष राज्याच्या आणि शिवसैनिकांच्या मनात नाही. काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला गेला. शिवसेना काय आहे आणि कोणाबरोबर आहे, हे आता महाराष्ट्राला माहिती आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही वाचा – Ajit Pawar Vidarbha Visit : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची अजित पवारांकडून पाहणी; म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी तत्काळ….”

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी टाळला होता उल्लेख

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना बुधवारी (२७ जुलै) जन्मदिनाच्या शुभेच्छा देत ट्वीट केले होते. यात त्यांनी त्यांचा उल्लेख माजी मुख्यमंत्री असा केला. मात्र, पक्षप्रमुख या पदाचा उल्लेख टाळला. यावरून अनेक राजकीय चर्चांना उधाण आले होते. याबाबत बंडखोर शिंदे गटातील खासदार राहुल शेवाळे यांना विचारण्यात आलं. यावर त्यांनी मी एकनाथ शिंदेंच्या शुभेच्छांवर काहीही बोलू शकत नाही, असं मत व्यक्त केलं होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar vidarbha visit criticized cm eknath shinde and demand to take assembly session spb 94
Show comments