Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या आक्रमक स्वभावासाठी आणि धडाधड निर्णय घेण्यासाठी ओळखले जातात. सध्या अजित पवार ( Ajit Pawar ) यांची जनसन्मान यात्रा सुरु झाली आहे. निवडणूक प्रचाराचा नारळ त्यांनी फोडला आहेच. कधी ते शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत, कधी चहाच्या टपरीवर जात आहेत, कधी भगिनींबरोबर सेल्फी काढत आहेत. अशात पिंपरीमधल्या एका दिव्यांग भगिनीसह अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी केलेला संवाद चर्चेत आला आहे.

नेमकं काय घडलं?

पुण्यातल्या पिंपरी या ठिकाणी एका दिव्यांग भगिनीशी अजित पवारांनी संवाद साधला आणि तिची चौकशी केली. दोन हात नसतानाही तिने मोबाइल नंबर डायल केला. तसंच मी स्वयंपाक करते असंही अजित पवारांना ( Ajit Pawar ) सांगितलं तेव्हा “व्वा गं माझी मैना” असं म्हणत त्या भगिनीचं अजित पवारांनी कौतुक केलं. तसंच तिला मदतीचं आश्वासनही दिलं.

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
There is no bargaining power remain in eknath shinde and ajit pawar says congress leader vijay wadettiwar
“एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यात ‘बार्गेनिंग पॉवर’ नाही,” विजय वडेट्टीवार असे का म्हणाले? वाचा…
People who laughed at my work and made fun of me are today giving compliments and saluting Bela Gram Panchayat
‘टीका करणारे आता कौतुकाचा वर्षाव करीत आहेत’…राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त बेला गाव अन् महिला सरपंचाची अनोखी यशोगाथा
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
ajit pawar rahul narvekar
Video: “जे आहे ते आहे, लाडक्या बहिणीनेच आम्हाला…”, अजित पवारांची विधानसभेत स्पष्टोक्ती!
kareena Kapoor
“आतापर्यंतची सर्वात कूल गँगस्टर…”, करीना कपूरच्या शर्मिला टागोरांना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा; म्हणाली, “माझ्या सासूबाईंना…”

हे पण वाचा- Pink Color : अजित पवारांच्या गुलाबी थीममुळे रंग चर्चेत, मात्र हा कलर महिला किंवा मुलींशी कधी आणि कसा जोडला गेला?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या प्रसंगाबाबत काय म्हटलं आहे?

पिंपरीमध्ये जनसन्मान यात्रेदरम्यान एका धाडसी भगिनीने आपल्या लहान मुलासह अजित पवारांची ( Ajit Pawar ) भेट घेतली. एका अपघातात आपले दोन्ही हात गमावूनही ती भगिनी हार न मानता खंबीरपणे लढते आहे. आपला भाऊ म्हणून तिने दादांना हक्काने घर मिळवून देण्याची विनंती केली. दादांनीही तातडीने तिला घर मिळवून देण्याचे वचन दिले. या भगिनीने आपले हात गमावले असले तरी, ती अजूनही सर्व घरकाम स्वतःच करते. दादांबरोबरच्या भेटीदरम्यान, तिने स्वतः मोबाईल फोन कसा वापरते हेही दादांना दाखवले. यावेळी बोलताना अजित पवारांनी राज्यातील सर्व माऊलींना आश्वस्त केले की, तुमचा अजितदादा प्रत्येक संकटात तुमच्यासोबत भावासारखा उभा आहे.

अजित पवारांनी काय आश्वासन दिलं?

एका अपघातात आपले दोन्ही हात गमावूनही ती भगिनी हार न मानता खंबीरपणे लढत आहे. आपला भाऊ म्हणून तिने अजित पवारांना हक्काने घर मिळवून देण्याची विनंती केली. अजित पवारांनीही ( Ajit Pawar ) तिला तातडीने घर मिळवून देण्याचं वचन दिलं. या भगिनीने आपले हात गमावले असले तरी, ती अजूनही सर्व घरकाम स्वतःच करते. अजित पवार यांच्यासमवेतच्या भेटीदरम्यान, तिने स्वतः मोबाईल फोन कसा वापरते हेही उपमुख्यमंत्र्यांन दाखवले. तसेच, मी घरातील सर्व कामे करते, स्वयंपाक करते, पोळ्यांसाठी पीठ मळून घेते, कपडे-भांडी देखील धुते, असे तिने म्हटले. तसंच अजित पवारांना मोबाईलवरुन नंबर डायल करुन दाखवलं. त्यानंतर, अजित पवारांनी तिच्यासमोर हात जोडून, नंतर तिच्या डोक्यावर हात ठेवला. वा गं माझी मैना… असे म्हणत तिच्या कर्तबगारीला दाद दिली. तसेच, या महिलेच्या मोबाईलमध्ये अधिकाऱ्याला नंबर सेव्ह करुन देण्यासही बजावले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Story img Loader