महाराष्ट्रात २०१९ साली झालेल्या निवडणुकांनंतर राजकीय महानाट्याचा अंक रंगल्याचं सगळ्यांनीच पाहिलं. आधी सेना-भाजपाचं बिनसलं. नंतर अजित पवारांनी फडणवीसांसोबत शपथ घेतली. चारच दिवसात ते सरकार गडगडलं आणि महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं. २०२२ साली ठाकरे गटात मोठी फूट पडली आणि सरकार कोसळलं. २०२३ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तशीच फूट पडली आणि अजित पवार गट सरकारमध्ये सामील झाला. या राजकीय घडामोडींमुळे महाराष्ट्रातला सत्तानाट्याचा अंक अद्याप संपला नसल्याचंच सातत्याने समोर येत आहे. आता अजित पवार गट भाजपाबरोबर सत्तेत असताना त्यांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे. या व्हिडीओत ते मोदींना हटवण्याची भाषा करत आहेत.

मकर संक्रांतीच्या ‘राजकीय’ शुभेच्छा!

हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे याविषयी अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. मात्र, २०१९ च्या निवडणुकांदरम्यानचा हा व्हिडीओ असल्याचं सांगितलं जात आहे. या व्हिडीओमध्ये अजित पवार एका सभेमध्ये भाषण करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशीचा हा व्हिडीओ असल्याचं त्यातल्या शब्दांवरून समजतंय. हा व्हिडीओ व्हायरल होत असताना नेटिझन्सनी जोरदार ट्रोलिंग सुरू केलं आहे.

anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Groom dance for bride on hoshil ka ya pathyachi sobar gharwali marathi song video goes viral on social media
VIDEO: “बायको पाहिजे नखरेवाली” मराठमोळ्या गाण्यावर नवरदेवाचा भन्नाट डान्स; काय ते प्रेम, काय तो डान्स…आहाहा!
two sons of a mother joined the army together
मायबापाच्या कष्टाचं फळ! दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात, VIDEO होतोय व्हायरल
Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
Girls group dance on marathi song Udhalit Yere Gulal Sajana Tu Sham Mi Radhika video goes viral
VIDEO: काय ती अदा, काय तो डान्स! “उधळीत येरे गुलाल सजना तू शाम मी राधिका” मराठमोळ्या गाण्यावर तरुणींचा तुफान डान्स

“मिलिंद देवरा शिंदे गटाआधी आमच्याकडे…”, ठाकरे गटाचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, “ते त्या दुकानात गेले कारण…”

काय म्हणतायत अजित पवार?

या व्हिडीओमध्ये अजित पवार मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देताना भाजपाला हटवण्याची विनंती समोरच्या उपस्थितांना करताना दिसत आहेत. “उद्याच्या मकर संक्रांतीच्या मी तुम्हाला शुभेच्छा देतो. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, पण या मोदीला हटवा. भाजपाला बाजूला करा”, असं आवाहन अजित पवार करताना दिसत आहेत. यंदा मकर संक्रांतीच्या निमित्ताने राज्यातील राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचा हा व्हिडीओ व्हायरल होत असताना त्यांना लक्ष्य केलं जात आहे.

नेटिझन्सकडून टीका

२०१९ च्या निवडणुकीत मोदींविरोधी भाषणं करणारे अजित पवार आता राज्यात भाजपा व शिंदे गटासह सत्तेत असल्यामुळे हा राजकीय चर्चेचा विषय ठरला आहे.

काही नेटिझन्सनी “काय होतास तू, काय झालास तू, अरे वेड्या कसा वाया गेलास तू”, असा टोला लगावला आहे. काही नेटिझन्सनी या व्हिडीओवर उलट उद्धव ठाकरेंचा व्हिडीओ पोस्ट करत त्यावर प्रत्युत्तर दिलं आहे.

या व्हिडीओत उद्धव ठाकरे नरेंद्र मोदींना मत देण्याचं आवाहन करताना दिसत आहेत. हा व्हिडीओही नेमका कधीचा आहे, याविषयी माहिती नसून तो २०१४ च्या निवडणुकांआधीचा असल्याचं सांगितलं जात आहे.

Story img Loader