Ajit Pawar Vishalgad Fort : अजित पवार यांनी विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गावात आणि विशाळगडावरील अतिक्रमण झालेल्या भागाची पाहणी केली. तसेच ज्या अतिक्रमणावर प्रशासनाने कारवाई केली आहे त्याचीदेखील पाहणी केली. यावेळी अजित पवार यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. “कोणाच्याही घरावर कारवाई होणार नाही”, असं सांगत अजित पवारांनी ग्रामस्थांना आश्वस्त केलं. “विशाळगडावर उसळलेल्या दंगलीप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल”, असंही अजित पवार यावेळी म्हणाले. कोणीही कायदा व नियम हातात घेण्याचा प्रयत्न करू नये, अशा शब्दांत अजित पवारांनी सर्वांनाच खडसावलं.
अजित पवार म्हणाले, “निष्पाप लोकांच्या घरांचं नुकसान झालं आहे. इथे राहणाऱ्या लोकांचा आणि अतिक्रमणाचा काहीही संबंध नव्हता. त्यामुळे नुकसानग्रस्तांना प्रशासनाच्या वतीने प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत केलेली आहे. संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल.”
विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आंदोलन सुरू केलं होतं. या आंदोलनादरम्यान विशाळगडावरील वातावरण चिघळलं होतं. यावरून अजित पवार म्हणाले, “संभाजीराजेंबरोबर आम्ही बैठक घ्यायला तयार होतो. चर्चेतून मार्ग काढला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबरही सगळ्या जाती-धर्मांचे लोक होते. संभाजीराजेंनी देखील धीराने घ्यायला पाहिजे होतं. आता ते सरकारवर टीका करत आहेत, मात्र या सगळ्याला सरकार कसं काय जबाबदार?”
वातावरण बिघडवू पाहणाऱ्यांना अजित पवारांची तंबी
हे ही वाचा >> “लाडका भाऊ नावाची कोणतीही योजना नाही, खरंतर…”, जितेंद्र आव्हाडांकडून शिंदे-फडणवीस सरकारची पोलखोल?
दरम्यान, अजित पवार यांनी वातावरण बिघडवू पाहणाऱ्यांना तंबी दिली. ते म्हणाले, कोणीही सोशल मीडियाच्या माध्यमातून वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करू नका. कोणी तसा प्रयत्न केल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल. गड-किल्ल्यांचं संरक्षण झालं पाहिजे, सरकार त्यास अनुकूल आहे.”
दंगलग्रस्त गजापूर, मुसलमानवाडीत तातडीची मदत वाटप सुरू
किल्ले विशाळगड अतिक्रमणमुक्तीसाठी झालेल्या आंदोलनावेळी किल्ल्यावर आणि आसपासच्या गावांमध्ये हिंसाचार झाला होता. दरम्यान, या हिंसाचारामुळे नुकसान झालेल्या कुटुंबांना मदत वाटप सुरु झालं आहं. ५६ कुटुंबाना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे धनादेश देण्यात आले आहे. गजापूरमधील मुसलमानवाडी (ता. शाहुवाडी) या गावात रविवारी झालेल्या हिंसाचारात अनेक कुटुंबांचं अतोनात नुकसान झालं होतं. मुसलमानवाडी येथील अंदाजे ४१ घरांची जमावाने नासधुस केल्यामुळे प्रापंचिक साहित्याबरोबरच घरांचंही नुकसान झालं होतं. या वाडीत जवळपास ५६ कुटुंबं रहातात. त्यांना शासनातर्फे तातडीची मदत म्हणून प्रापंचिक साहित्यासाठी २५ हजार रुपये आणि घर दुरुस्तीसाठी ४१ घरांना प्रत्येकी २५ हजार रुपये धनादेशाद्वारे मदत म्हमून देण्यात आले आहेत.