घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सज्जड दम भरला. आता जर घोषणा दिल्या तर तिकीट कापेन असं म्हणत अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना इशारा दिला. शिरूरमधून राष्ट्रवादी काँग्रेस देईल तो उमेदवार तुम्हाला निवडून द्यावा लागेल असं आवाहन अजित पवार यांनी केलं. त्यावेळी काही कार्यकर्त्यांनी माजी आमदार विलास लांडे यांच्या नावाने घोषणाबाजी केली. ज्यानंतर अजित पवार चांगलेच संतापले. बेंबीच्या देठापासून ओरडत आहात, २००९ ला तिकीट दिलं तेव्हा काय केलं? असा प्रश्नही अजित पवारांनी विचारला. त्यावेळी आता जर घोषणाबाजी सुरु राहिली तर एकेकाचं तिकीट कापेन असा इशाराच अजित पवार यांनी दिला. पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादीत प्रवेश केलेले अभिनेते अमोल कोल्हे यांचीही हजेरी होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरी-चिंचवड मधील राष्ट्रवादीच्या जाहीर सभेत माजी आमदार विलास लांडे यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या नावाच्या घोषणा देत होते.तेव्हा विलास लांडे यांनाच कार्यकर्त्याना शांत करावे लागले.तरी देखील उत्साही कार्यकर्ते थांबायचं नाव घेत नव्हते.राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर नुकतेच शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत आलेले अभिनेते अमोल कोल्हे हे देखील उपस्थित होते.त्यांच्याकडे शिरूर लोकसभा निवडणुकीचे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिलं जातंय.त्यामुळेच सभेत खासदाराकीसाठी उत्सुक असलेले लांडे यांच्या नावाचा जयघोष सुरू होता.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण सुरू असताना लांडे यांच्या कार्यकर्त्यानी पुन्हा घोषणा द्यायला सुरुवात केली,त्यावेळी अजित पवार यांनी शांत बसण्यास सांगितले राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यावर निर्णय घेतील त्यांनी कार्यकर्त्याना भाषणातून सांगितलं. परंतु काही उत्साही कार्यकर्ते लांडे यांचा जयघोष करत होते,त्यावेळी संतापलेल्या अजित पवार यांनी आता जर घोषणाबाजी केली तर त्यांचं तिकीटच कापून टाकतो असा दम दिला. तेव्हा कार्यकर्ते शांत बसले.