लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोलापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार हे महाविकास आघाडीमध्येच राहिले असते, तर ते येणाऱ्या काळात राज्याचे मुख्यमंत्री झालेले दिसले असते, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा आज सोलापूर जिल्ह्यात दाखल झाली. या वेळी माळशिरसमध्ये पाटील बोलत होते. अलीकडेच एका कार्यक्रमात अजित पवार यांनी आपल्यापेक्षा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे दोघेही कनिष्ठ असताना ते मुख्यमंत्री झाले आणि आपण ज्येष्ठ असूनही आपल्याला आजवर ती संधी मिळाली नसल्याचे मत व्यक्त केले होते. याचा संदर्भ देत पाटील यांनी वरील मत व्यक्त केले.

आणखी वाचा-अजगर पकडल्याने वारणावती निर्धास्त, तर कर्नाळ परिसर बिबट्याचा वावराने भयभीत

पाटील म्हणाले, की महायुती सरकार पूर्णतः घाबरलेले आहे. म्हणूनच सलग नऊ वेळा अर्थसंकल्प मांडल्यानंतर आता दहाव्या अर्थसंकल्पात सरकारने तिजोरीचा दरवाजाच उघडला आहे. मतदारांना आकृष्ट करण्यासाठी वारेमाप घोषणा केल्या जात आहेत.

या योजनांना आमचा विरोध नाही. आमचा लाडकी बहीण योजनेला विरोध नाही. मात्र सत्तेवर आल्यानंतर आम्ही अधिक चांगल्या पद्धतीने ती अमलात आणू, असे आश्वासन दिले.या मेळाव्यास ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील हे उपस्थित होते. या वेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, पक्षाचे प्रदेश युवक अध्यक्ष महिबूब शेख, उत्तम जानकर आदींची भाषण झाली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar was in aghadi he would have become chief minister in future jayant patils criticism mrj