अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४० आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्यानंतर पक्षात उभी फूट पडली आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षचिन्हावर दोन्ही गटांकडून दावा सांगितला जात आहे. अशी एकंदरीत स्थिती असताना आज (शुक्रवार, १४ जुलै) अजित पवार अचानक शरद पवार यांचं निवासस्थान असणाऱ्या ‘सिल्व्हर ओक’वर दाखल झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच शरद पवारांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. काकू प्रतिभा पाटील यांच्या हाताची शस्त्रक्रिया झाल्याने विचारपूस करण्यासाठी अजित पवार ‘सिल्व्हर ओक’वर गेल्याची माहिती मिळत आहे. पण घरी शरद पवार आहेत की नाहीत? याबाबतची कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही.

हेही वाचा- “अबे तू नेमका कुणाचा प्रचार करणार ते ठरव आधी”, महायुतीच्या नेत्यांमध्येच जुंपली

आज अचानक अजित पवार ‘सिल्व्हर ओक’वर दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. पण प्रतिभा पवार यांच्या हातावर शस्त्रक्रिया झाल्याने काकूंची भेट घेण्यासाठी अजित पवार शरद पवारांच्या निवासस्थानी गेल्याचं समजत आहे. काही वेळापूर्वी प्रतिभा पवार यांना ब्रेच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्या घरात पाय घसरून पडल्याची माहिती मिळत आहे.