काही दिवसांपूर्वी अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. अजित पवारांना भारतीय जनता पार्टीने मुख्यमंत्री करण्याचा शब्द दिल्याने ते सरकारमध्ये सामील झाले, असा दावा महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह १६ आमदार लवकरच अपात्र ठरतील आणि मुख्यमंत्रीपदी अजित पवारांची वर्णी लागेल. पुढील सहा महिन्यात सर्व चित्र बदलेल, असा दावाही काही नेत्यांकडून केला जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याबाबत मोठं वक्तव्य त्यांनी केलं. अजित पवारांना जेव्हा मुख्यमंत्री बनवायचं असेल तेव्हा त्यांना पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री बनवू, असं सूचक वक्तव्य फडणवीसांनी केलं. ते ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

हेही वाचा- कारखान्यावरील कारवाईवर रोहित पवारांची खळबळजनक पोस्ट; म्हणाले, “एका नेत्याबद्दल अंदाज योग्य होता, पण…”

सहा महिन्यात अजित पवार मुख्यमंत्री होतील, या चर्चेबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, “पहिली बाब म्हणजे सहा महिन्यांत कोणत्याही गोष्टी बदलत नाहीत. अजित पवारांना जेव्हा मुख्यमंत्री बनवायचं असेल, तेव्हा त्यांना पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री बनवू. जेव्हा संधी मिळेल तेव्हा त्यांना मुख्यमंत्री करू.”

हेही वाचा- २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात शरद पवारांचा हात? फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट

“आता मी तुम्हाला स्पष्टपणे एवढंच सांगू इच्छितो की, सध्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. तेच मुख्यमंत्री राहतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली लोकसभा – विधानसभा निवडणुका लढवल्या जातील. त्यामुळे महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलणार आहे, हे तुम्ही डोक्यातून काढून टाका. महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलणार नाहीत म्हणजे बदलणार नाहीत,” असंही फडणवीस पुढे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar will be cm for 5 years devendra fadnavis statement rmm