बाप्पाच्या श्रद्धेपोटी मुंबईसह आजूबाजूच्या शहरांत स्थायिक असलेले कोकणवासिय गणेशोत्सवात मोठ्या संख्येने गावी जात असतात. त्यासाठी तीन महिने आधीच रेल्वे बुकींग केली जाते. कोकण प्रवाशांची संख्या लक्षात घेता अतिरिक्त गाड्याही सोडल्या जातात. परंतु, यावेळेस गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांची तिकिटे अवघ्या मिनिटभरात फुल्ल झाल्याने अनेक कोकणवासियांचा हिरमोड झाला आहे. तिकिटविक्री दलाल आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी गैरप्रकार केल्याचा आरोप सर्वस्तरातून केला जातोय, त्यामुळे याची चौकशी व्हावी अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. तसेच कोकणच्या चाकरमान्यांच्या सोईसाठी गणेशोत्सव काळात अतिरिक्त रेल्वे गाड्या कोकणात सोडण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्राव्दारे केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना केली आहे. अजित पवार यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना पत्र दिले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा