लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
श्रीवर्धन : देशात नरेंद्र मोदी यांना पर्याय नाही हे पुन्हा एकदा चार राज्यातील निवडणूक निकालांवरून स्पष्ट झाले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश येथे भाजपचे सरकार येत आहे. एनडीएचा घटक पक्ष म्हणून नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे मी अभिनंदन करतो. श्रीवर्धन येथे पाणीपुरवठा योजना आणि समुद्रकिनारा सुशोभीकरण लोकार्पण सोहळ्या दरम्यान अजित पवार बोलत होते…
आणखी वाचा-‘घरी बसलेल्या नेत्यांना मतदार आता कायमचं…’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विरोधकांवर टीका
तेलंगणाचे भारतीय तेलंगणा, मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या चार महत्वाच्या राज्यांचे निवडणूक निकाल आज लागले. तेलंगणाचे बिआरएसचे चंद्रशेखर राव हे महाराष्ट्रात यायचे, सभा घ्यायचे प्रचार करायचे, देशात आणि राज्यात सरकार निर्माण करायला निघाले होते. मला कळायचे नाही निवडणूक तेलंगणाची आहे की महाराष्ट्राची आहे. पण महाराष्ट्रात सत्ता काबीज करण्यासाठी निघालेल्या राव यांची तेलंगणातील सत्ता राखता येणार नसल्याचे दिसतंय. शेवटी जनता जनार्दन सर्व ठरवते. या निकालांनी पुन्हा एकदा एक्झिट पोलचे अंदाज चुकवले आहेत. काही दिवसांपूर्वी चार राज्यात निवडणूका झाल्या आज निकालाचा दिवस होता. तेलंगणाचे बिआरएस राव महाराष्ट्रात यायचे इथे येऊन प्रचार करायचे, पण निकालावरून त्यांची परिस्थिती बिकट आहे. जनता जनार्दन सर्वोच्च आहे. एक्झिट पोल चुकीचे ठरले की काय असे म्हणायची वेळ आली आहे अशी प्रतिक्रीया अजित पवार यांनी दिली.
छत्तीसगडमध्ये भाजपकडे चेहरा नाही असे म्हटले जात होते. पण नरेंद्र मोदी हेच भाजपचा चेहरा आहेत, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. असंही अजित पवारांनी यावेळी सांगितले.