मुंबईवरील २६ नोव्हेंबर २००८ मध्ये झालेल्या दहशदवादी हल्ल्यातील एकमेव जीवंत दहशतवादी अजमल कसाब याला आज (बुधवार) सकाळी साडेसात वाजता पुण्यातील येरवडा कारागृहात फाशी देण्यात आली. सरकारी वकील उज्वल निकम यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे.
दहशदवादी अजमल कसाबचा दयेचा अर्ज राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी फेटाळला होता. महाराष्ट्रात नागपूर आणि येरवडा या दोनच तुरुंगामध्ये फाशी देण्याची यंत्रणा आहे. त्यामुळे कसाबला दोन दिवसांपूर्वीच मुंबईच्या अर्थर रोड तुरूंगातून येरवडा कारागृहात हलवण्यात आले होते. आणि आज (बुधवार) पहाटे त्याला फाशी देण्यात आली.  
मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी  झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १६६ लोक मारले गेले होते. कसाबला विशेष न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातर्फे फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.

मुंबईवरील हल्ला हा देशावरील हल्ला होता.
त्या हल्ल्याला मुंबईच्या बहादूर अधिकायांनी, पोलिस शिपायांनी चोख उत्तर दिले. आज कसाबला फाशी झाल्याने या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना ख-या अर्थाने श्रध्दांजली मिळाली असल्याचे राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी म्हटले आहे.
भारताने संपूर्ण न्यायप्रक्रिया पूर्ण करूनच कसाबला फाशी दिली असल्याने भारतात कायद्याचे राज्य असल्याचे सिध्द झाले आहे, असंही ते म्हणाले.