वाई: आखिल भारतीय मराठा महासंघाचे राज्य युवकचे उपाध्यक्ष प्रसाद प्रदीप कोंडे – देशमुख यांच्यावर भादे (ता खंडाळा) गावच्या हद्दीत मोर्वे – वाघोशी रोडवर दोन अज्ञात तरुणांकडून गोळीबार करण्यात आला. यानंतर कोंडे यांच्या सुरक्षा रक्षकांकडून देखील अज्ञाताना भिती दाखवण्यासाठी हवेत गोळीबार करण्यात आला. सुदैवाने कोणतीही जीवित हानी  झाली नाही. गोळीबाराची माहिती मिळताच  पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

खंडाळा तालुक्यातील वाघोशी ते मोर्वे रस्त्यावरन कोंडे- देशमुख मोटारीतून  जात असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञात दोघांनी त्यांच्यावर  दोन गोळ्या झाडल्या. त्याला प्रत्युतर म्हणून त्यांच्या सूरक्षा रक्षकाने दोन गोळ्या हवेत झाडल्या. यामष्ये कोणीही जखमी झाले नाही. प्रसाद कोंडे- देशमुख वीर (ता पुरंदर) येथील श्रीनाथ म्हस्कोबानाथ व  मोर्वेचे श्री दत्त मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आपल्या मोटारीतून  लोणंदकडे जात असताना हा प्रकार घडला. प्रत्युत्तर होताच दुचाकीस्वार पळून गेले.

Suresh Dhas On Dhananjay Munde
Maharashtra News Updates : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत सुरेश धस यांचं मोठं विधान; म्हणाले, “राजीनामा घेणं…”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
prime minister narendra modi dedicates two frontline naval warships and submarine to the nation
आत्मनिर्भरतेने भारत सागरी शक्ती ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन, दोन युद्धनौका, एका पाणबुडीचे लोकार्पण
nitin gadkari
Nitin Gadkari : करोना, दंगली, लढायांपेक्षा अधिक मृत्यू अपघातांमुळे… खुद्द गडकरींनीच…
Pratap Sarnaik Thackeray Group
Pratap Sarnaik : उद्धव ठाकरेंना मुंबईत धक्का बसणार? शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “ठाकरे गटाचे…”
possibility of Eknath Shinde and Ganesh Naik coming together in municipal elections is less
महायुतीच्या संकेतांना नवी मुंबईत खोडा? महापालिका निवडणुकीत शिंदे- नाईक मनोमिलनाची शक्यता धुसरच
Akola Municipal Corporation Election news in marathi
अकोला महापालिकेतील ‘प्रशासक राज’ केव्हा संपणार?; संभाव्य निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी, वर्चस्व राखण्याचे भाजपपुढे आव्हान
forest minister ganesh naik slams eknath shinde working style during cm tenure
शिंदेशाहीतील चुकांची उजळणी करत नाईकांचे वर्चस्वाचे संकेत

लोणंद व खंडाळा पोलीसांना मिळताच पोलीस निरीक्षक महेश इंगळे, सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर , उपनिरीक्षक देसाई, मोरे आपल्या सहकाऱ्यासमवेत घटनास्थळी दाखल झालेत. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. पोलीस पंचनामा करीत आहेत. कोंडे यांच्या कोणी व का गोळीबार केला याचा पोलीस शोध घेत आहेत.

Story img Loader