Akola Molesting Case : बदलापूरातील चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचारामुळे संबंध राज्यभर संतापाची लाट उसळलेली असताना आता आणखी एक घटना समोर येत आहे. अकोला जिल्ह्यातील एका ४२ वर्षीय शालेय शिक्षकाला चार महिन्यांत आठवीच्या सहा विद्यार्थिनींचा वारंवार विनयभंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली.

प्रमोद सरदार असे आरोपीचं नाव असून त्याने विद्यार्थ्यांना अयोग्यरित्या स्पर्श करण्यापूर्वी त्याच्या मोबाइल फोनवर अश्लील व्हिडिओ दाखवला. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, अकोला शहरापासून ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या काझीखेडा गावातील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात हा अत्याचार झाला. पीडितांपैकी एकाने १०९८ चाइल्ड हेल्पलाइनवर कॉल करण्याचे धाडस दाखविल्यानंतर ही घटना उघडकीस आली. तक्रारदाराची ओळख उघड करण्यात आलेली नाही, परंतु तक्रारीमुळे बालकल्याण समितीने (CWC) चौकशी केली.

rape college student in Odisha
Rape On Girl : महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कार, कॅफेतला व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेलिंग, सहा नराधम अटकेत
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
Hyderabad Airport Bomb Threat
‘बॉम्ब’चा टोमणा मुलीला महागात पाडला, विमानतळावर उडाली खळबळ; मेटल डिटेक्टरच्या आवाजामुळे गोंधळात भर
stepfather rape daughter
मुंबई: अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या, मानखुर्दमधील धक्कादायक घटना
kaanchi re kaanchi re
कांची रे कांची गाण्यांवर सरांनी केला भन्नाट डान्स, “तुमच्या शाळेत डान्स करणारे शिक्षक होते का?” पाहा Viral Video
TET, AI, TET malpractices, TET news, TET latest news,
‘टीईटी’वर आता एआय ठेवणार नजर… गैरप्रकार रोखण्यासाठीच्या उपाययोजना काय?

हेही वाचा >> Badlapur School Case : “दादाने माझे कपडे काढले”, बदलापूर अत्याचार प्रकरणातील घाबरलेल्या मुलीने पालकांना दिली होती माहिती; FIR मध्येही नोंद!

आठवीच्या मुलींशी वैयक्तिक चर्चा केल्यानंतर प्रकार उजेडात

मंगळवारी सीडब्ल्यूसी सदस्यांनी विद्यार्थ्यांसोबत तासभर सत्र आयोजित करण्याच्या बहाण्याने शाळेला भेट दिली. त्यांनी इयत्ता आठवीच्या वर्गातील मुलींशी वैयक्तिकरित्या बोलण्याची विनंती केली. यावेळी पीडित मुलींनी गेल्या चार महिन्यांपासून त्यांना सहन केलेल्या आघातांची माहिती दिली.

मुलींची साक्ष ऐकून CWC सदस्यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधला. उरल पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गोपाल ढोले यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले, “आम्हाला एका CWC सदस्याचा कॉल आला आणि अल्पवयीन मुलींचे जबाब नोंदवण्यासाठी पोलीस पथक शाळेत पाठवले.” त्यानंतर पोलिसांनी प्रमोद सरदारला ताब्यात घेतले आणि त्याच्यावर लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पोक्सो) कायदा आणि भारतीय न्याय संहिता (बीएनएस) च्या इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला.

शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र समदूर यांनी याप्रकरणी सारवासारव करत आपल्याला या गैरवर्तनाची माहिती नसल्याचे सांगितले. “जर मला याबद्दल माहिती असती, तर मी पहिल्यांदाच कारवाई केली असती. CWC टीमने मुलींशी बोलले तेव्हाच आम्हाला या गुन्ह्याबद्दल कळले”, असं समदूर म्हणाले.

आरोपीवर कडक कारवाईची मागणी

महिला आयोगाच्या माजी सदस्या आशा मिरजे यांनी या घटनेचा निषेध करत आरोपी शिक्षकावर कडक कारवाईची मागणी केली आहे. शाळेत असे गैरवर्तन कोणाच्याही लक्षात न येता कसे घडू शकते असा सवाल करत त्यांनी संपूर्ण शाळेच्या कर्मचाऱ्यांवर टीका केली.